राशीनची आई देवी येमाई ( जगदंबा )
राशीनची आई देवी येमाई ( जगदंबा ) जगदंबा देवी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असणारे राशीन हे एक ऐतिहासिक गाव आहे आणि समस्त राशीन पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे तसेच महाराष्ट्रातील बऱ्याच अंशी लोकांचे प्रमुख कुलदैवत म्हणून ओळखले जाणारे, ऐतिहासिक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले तसेच राशीन नगरीच्या सांस्कृतिक, वैभवशाली वारशाचे प्रतीक म्हणजे श्री येमाई माता मंदिर म्हणजेच श्री जगदंबा माता मंदिर आहे. फोटो साभार फेसबुक हे मंदिर साधारणतः 1500 ते 1800 वर्षांपूर्वी चे आहे असे स्थानिक लोकांकडून सांगितले जाते.हे मंदिर या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी कलाकृती मध्ये करण्यात आलेल आहे.तसेच हे मंदिर इ.स.1704 ते 1710 या काळात अकोबा शेटे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.मंदिराचे बांधकाम अतिशय लक्षवेधी आहे त्यावरील नक्षीमकाम नुसतं बघू च वाटत असच आहे. जगदंबा देवी चा ऐतिहासिक संदर्भ अस म्हणतात की जगदंबा देवी ची मूर्ती स्वतः प्रकट झालेली म्हणजेच स्वयंभू आहे.आई जगदंबा देवी ने नवरात्रीमध्ये महिषासुराशी 9 दिवस युद्ध करून त्याचा नाश केला त्यापैकी च हे एक स्थान आहे. अशी ही एक क...