हवामान अंदाज 2023 यंदा मे मध्ये ही अवकाळी पाऊस जून महिन्याच्या या तारखेला होणार पावसाची एन्ट्री कसा राहणार मान्सून अंदाज काय म्हणाले पंजाबराव डक



हवामान अंदाज 2023 यंदा मे मध्ये ही अवकाळी पाऊस जून महिन्याच्या या तारखेला होणार पावसाची एन्ट्री कसा राहणार मान्सून अंदाज काय म्हणाले पंजाबराव डक


फोटो साभार - गुगल





महाराष्ट्र भूषण ऑनलाईन ।

यंदाच्या 2023-24 च्या मान्सून बाबतीत देश विदेशातील हवामान तज्ञांच्या संशोधनानुसार वेगवेगळे अहवाल संगीतले जात आहेत यंदा भारतासह संपूर्ण आशिया खंडात दुष्काळ पडेल असाही अंदाज अमेरिकन हवामान तज्ञांकडून वर्तविला जात आहे.


सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान होत आहे त्यातच (skaymate) देशाच्या उत्तर आणि मध्य भागात पाऊस कमी पडण्याची शक्यता सांगितली आहे त्यानंतर आता (weather department)  ने यंदा मान्सून सामान्य च राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

भारत हा शेतीप्रधान देश असल्या कारणाने इथला 80 टक्के भाग हा शेतीवर च अवलंबून आहे पाऊस सामान्य राहिल्यास देशातील अन्नधान्य उत्पादन ही सामान्य राहण्याची शक्यता आहे त्यामुळे महागाईवर याचा परिणाम होऊन दिलासा मिळण्याची शक्यता आहे.यंदा देशाच्या सरासरी 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.



"अल निनो " च्या  धोक्यामुळे यंदाचा मान्सून सरासरी पेक्षा कमी पडेल असे ( skymate ) कडून सांगण्यात येत आहे.त्यातच जून ते सप्टेंबर या काळात मान्सून नेहमीपेक्षा 6 टक्के कमी पडणार असून हे प्रमाण 94 टक्के असणार आहे त्यामुळे याचा भारतातील शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.


यंदाच्या मान्सून बद्दल काय म्हणाले पंजाबराव डक..? 


अहमदनगर येथील शासकीय विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये परभणी चे हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी यंदाचे 2023 चे हवामान पाऊस पाणी यावर आपला अंदाज व्यक्त केला यावर्षी चा मान्सून समाधानकारक च राहणार आहे.गेल्यावर्षी ज्या पद्धतीने समाधानकारक  पाऊस पडला त्याच पद्धतीने यावर्षी 2023 ला देखील पडणार.महाराष्ट्रात यावर्षीच्या पाऊसाची एन्ट्री  8 जूनला होईल आणि 22 जुननंतर महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात होईल.


फोटो साभार - गुगल 


मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर जून अखेर पर्यंत राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पेरणी आटपली जाईल तसेच जून महीन्यापेक्षा जुलैमध्ये आणि जुलै महिन्यापेक्षा ऑगस्ट,सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये अधिक पाऊस राहण्याचे मत व्यक्त केले आहे.





Comments

Popular posts from this blog

मोबाईलवरून पैसे कसे कमवायचे? | Online Earning Marathi Guide

घरबसल्या पैसे कमवण्याचे 10 खात्रीशीर मार्ग (2026 अपडेट)

सरकारी योजना 2026: सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या 10 महत्वाच्या योजना । मराठी माहिती