काही गाड्यांना BH ही नं प्लेट सिरीज का असते ..? ती कोणाला मिळू शकते
महाराष्ट्र भूषण ऑनलाईन ।
आजपर्यंत तुम्ही गाड्यांच्या नं प्लेट वर वेगवेगळे फॅन्सी नं पाहिलेच असतील प्रत्येकाच्या आवडीनुसार जो तो आपल्या पद्धतीने आपल्या गाड्यांचे नं मनाप्रमाणे आणि extra चार्जेस देऊन घेतात सुद्धा तसेच प्रत्येक नं प्लेट वर त्या त्या राज्याच्या सिरीज नुसार नं प्लेट सिरीज असते. उदा.महाराष्ट्रातील गाडी असेल तर तिची सिरीज MH ने सुरुवात असते.कर्नाटकातील असेल तर KA,तामिळनाडू असेल तर TN, गोवा असेल तर GA अशा प्रकारे गाड्यांच्या नं प्लेट सिरीज असतात. ते त्या त्या राज्याचा कोड असतात म्हणून तशा असतात.पण तुमि काही गाड्यांवर कोणत्याही राज्याचा कोड नसून BH अशी सिरीज पहिली असेलच तर ही BH सिरीज काय आहे..? आणि कोणाला ही सिरीज देण्यात येते..?
ते आपण आज पाहणार आहोत.
BH नं प्लेट ला भारत नं प्लेट म्हणतात भारताच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 28 ऑगस्ट 2021 रोजी ही नंबर सिरीज लॉन्च केलेली आहे.
ही सिरीज संपूर्ण भारतात चालते जे लोक कामानिमित्ताने सारखे परराज्यात फिरत असतात अशा लोकांसाठी ही सिरीज खूप फायदेशीर आहे कारण या सिरीज मुळे वाहनांची पुन्हा पुन्हा रजिस्ट्रेशन ट्रान्सफर करण्याची गरज नाही त्यामुळे वेळ अन खर्च दोन्हीही वाचतात.
BH हि सिरीज कोणाला मिळू शकते..?
जे लोक संरक्षण क्षेत्रात काम करतात म्हणजेच सैन्यात किंवा निमलष्करात त्यांना BH ही सिरीज मिळू शकते.तसेच जे राज्य किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत त्यांनाही ही सिरीज मिळू शकते.याशिवाय जे खाजगी कंपनीमध्ये काम करनारे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा ही BH सिरीज मिळू शकते पण ते ज्या कंपनीमध्ये काम करतात त्या कंपनीचे कमीत कमी 4 तरी प्लांट इतर देशातील राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात पाहिजेत.BH सिरीजसाठी तुम्ही ऑनलाईन देखील अर्ज करू शकतात त्यासाठी तुमची कागदपत्रे तुम्ही परिवहन अधिकाऱ्यांकडून वेरीफाय करून घ्यावी लागतील.त्यानंतर वाहन मालकाला Morth च्या वाहन पोर्टल वर लॉग इन करून aplaay करावे लागेल.
Comments
Post a Comment