गडकोट किल्ल्यांवर श्री गणेशाची मूर्ती किंवा गणेशपट्टी हमखास पाहायला मिळते ती कशामुळे
गडकोट किल्ल्यांवर श्री गणेशाची मूर्ती किंवा गणेशपट्टी हमखास पाहायला मिळते ती कशामुळे..? गणेशोत्सव आला की महाराष्ट्रात धामधूम सुरू होते ते श्री गणरायाच्या स्वागताची जो तो आपल्या आपल्या परीने गणरायाच्या स्वागताची तयारी आपल्या सार्वजनिक गणेश मंडळात करताच पण आपल्या घरात सुद्धा दिमाखात अन आकर्षक पद्धतीने करतो कारण लहानांपासून थोरा मोठ्याना सुद्धा या उत्सवाचे वेड असते कारण बाप्पा म्हणजे सर्वांसाठी आवडीचा विषय आहे... असाच विषय पाहायला गेलो तर महाराष्ट्रातील बऱ्याच किल्ल्यावर तुम्हाला श्री गणेशाची मूर्ती किंवा गणेशपट्टी पहायला मिळेल त्यात श्री शिवरायांच्या आधीपासूनच चे किल्ले असोत किंवा श्री शिवछत्रपतींनी उभारलेले हिंदवी स्वराज्याचे किल्ले असोत त्यावर श्री गणेशाची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल तर काही किल्ल्यांवर गणेश मंदिरे सुद्धा बघायला मिळतील..महाराष्ट्रात वेगवेगळे असंख्य गडकोट किल्ले आहेत या किल्ल्याना अगदी आठ शतकांपासूनचा ते अठराव्या शतकापर्यँत चा इतिहास आहे त्यात सातवाहन,कलचुरी,राष्ट्रकूट, चालुक्य,अभिर,यादव,शिलाहार,मराठे असे कित्येक राजवंश या राजवंशाणी आप आपल्या इष्ट देवतेची ...