भगवंत गजेंद्र हत्ती अन मानवी जीवन
भगवंत , गजेंद्र हत्ती अन मानवी जीवन बऱ्याचदा तुमी हे चित्र पाहिले असेलच कदाचित ..यामध्ये एका मगरिने हत्तीचा पाय हत्तीचा धरला आहे ती त्याला ओढत आहे आणि तो हत्ती भगवान विष्णूला कमळ फुल अर्पण करत आहे ...त्याबद्दल आजच्या लेखात पाहुयात चित्र साभार फेेेसबुुक हे चित्र आहे हत्तींचा राजा " गजेंद्र " याचं " गजेंद्र " हत्तीवर मोहित असणाऱ्या हत्तीनीच्या कळपासोबत तो कमळांच्या तळ्यात जलविहार करत असतो..अचानक एक मगर त्याचा पाय आपल्या तोंडात धरून त्याला नदीमध्ये खोल पाण्यात ओढत न्यायचा प्रयत्न करते..गजेंद्र आपला पाय सोडविण्यासाठी आटोकाट जिवाच्या आकांताने प्रयत्न करतो पण मगर काय तिची मगर मिठी सैल करत नाही ..बाकी हत्तींनीही त्याला सोडविण्यासाठी प्रयत्न करतात पण त्याना ते जमत नाहीच....मग असहाय होऊन शेवटी तो नदीतील एक कमळ आपल्या सोंडेमध्ये उचलतो आणि भगवान श्री विष्णूची विनवणी करतो.. ही गोष्ट आणि चित्र का आहे यामागचे कारण म्हणजे " मानवी परिस्थिती " चे यात चित्रण केलेलं आहे.. आपण सगळेच " गजेंद्र " आहोत कधी कधी देवांसारखेच ऐहिक आणि भौतिक ...