आज माघ शुद्ध पंचमी वसंत पंचमी अर्थात जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा जन्मदिवस विशेष लेख
आज माघ शुद्ध पंचमी/वसंत पंचमी अर्थात जगतगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा जन्मदिवस फोटो फेसबुक साभार "अणुरेणिया थोकडा तुका आकाशाएवढा'' महाराष्ट्राच्या सोनेरी इतिहासाची पानं उलगडताना महाराष्ट्राला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणजे सतरावं शतक,ह्या शतकात या महाराष्ट्राने सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती घडवणारे दोन रत्न जन्माला घातले, एक जगदगुरु संत श्री तुकोराबाय आणि दुसरे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज अज्ञान,दारिद्र्य आणि गुलामगीरीची वाट पाहणार्या समाजासाठी संत तुकोबारायांचा जन्म संजीवनी देणारा ठरला.... फोटो फेसबुक साभार माणसाच्या जीवनात घडणार्या चांगल्या वा वाईट घटनांनी तो हुरळून वा खचून न जाता त्याकडे तटस्थपणे बघायचं असेल तर तुकोबारायांशिवाय पर्याय नाही.... नाहीतर स्वतःच्या पत्नी, मुलाच्या मृत्युकडे तटस्थ बघण्याचं धाडस कोण करील. फोटो फेसबुक साभार परमार्थिक क्षेत्रात श्री तुकोबारायांनी केलेल्या क्रांतीचं फळ आज...