भिमाजीबुवा काकडे शिंपी अन श्री संत सदगुरु गोदड महाराज
भिमाजी बुवा काकडे शिंपी अन श्री संत सदगुरु गोदड महाराज महाराष्ट्र ही संताची भूमी आहे प्रत्येक गावाला संतांचा महिमा सांगणारा इतिहास आहे असच अहमदनगर जिल्ह्यातील ता.कर्जत (धाकटीपंढरी) चे ग्रामदैवत असणारे निस्सीम विठठल भक्त श्री संत सद्गुरू गोदड महाराज हे महान संत शके १६८१ (१७५९)- शके १७५९(१८३७) या काळात होऊन गेले... भगवान श्री पांडूरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर ची दर एकदशी वारी करत असत पंढरपूर ला एके दिवशी चंद्रभागेमध्ये पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका स्त्री चा पाय राहुटीच्या दोरीला अडकला अन ती पडली तिचे मडके फुटले आणि सर्व पाणी वाया गेले मग चिडून त्या स्त्री कडून अपमान झाल्यावर महाराज क्रोधीत झाले अन चिडून विठ्ठल मंदिराकडे बघून.. मी पुन्हा तुझ्या कडे येणार नाही...हे जे ती स्त्री बोलली ते ती नाही तर तूच तिच्या रूपाने बोलला आहेस... तुला माझा कंटाळा आलाय.... आता मी स्वतः ला अग्नी समर्पित करून टाकतो ......म्हणून रागात चंद्रभागे तिरी आपले सर्व दिंडी साहित्य पेटवून त्यात उडी मारणार..... तोच भगवान पांडुरंग ब्राम्हणाच्या वेशात येऊन म...