चैत्र पौर्णिमा दोन चिरंजीव एकाचा जन्मदिवस तर एकाची पुण्यतिथी
चैत्र पौर्णिमा... दोन चिरंजीव...एकाचा जन्मदिवस..तर एकाची पुण्यतिथी..
एकाने त्या अंजनेरी पर्वतावर जन्म घेतला...
तर दुसर्याने त्या रायरीच्या पर्वतावर थाटात उभ्या केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर अखेरचा श्वास घेतला...
एक जन्मतः च चिरंजीव...तर एकाने मरणानंतर ही चिरंजीव पदाचे अढळपद कायम धगधगत ठेवले...
एकाने सत्राने उड्डाण करत हुंकार वदनी करत अवघा भूमंडळ डळमळीत करून टाकले...लहानपणी च सूर्याला गिळण्याचा प्रयत्न करत अवघ्या ब्रम्हांडात तिन्ही लोकी धोका धोका निर्माण करण्याचा धाडसी प्रयत्न केला..ज्याच्या नुसत्या हुंकाराने त्या रावणाच्या लंकेतील राक्षसी घाबरून सैरावैरा पाळायच्या इतकेच नाही तर लंकेतील ज्या स्त्रिया गरोदर असायच्या त्या सुद्धा गर्भगळीत होयच्या...ते श्रीराम भक्त श्री हनुमंत राय.
तर एकाने लहानपणी च वयाच्या सोळाव्या वर्षी च हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन अवघ्या मूठभर मावळ्यांना सोबत घेत बलाढ्य तोरणा किल्ला जिंकला अन हिंदवी स्वराज्याचा तोरण बांधण्याचं दैदिप्यमान धाडस केलं ते हिंदवी स्वराज्याचे स्थापन कर्ते छत्रपती श्री शिवराय...ज्यांच्या नुसत्या येण्याची चाहूल लागली तरीही शत्रूची ससेहोलपट होयची ...शत्रू मध्ये इतकी दहशत होती की शिवरायांना जादू टोना येतो...आता इथं तर थोड्याच वेळात तिथं..वो जंगल का भूत है...!! अशा चर्चा झडायच्या...पाण्यातही शत्रूंच्या घोड्यानाही शिवराय अन त्यांचे मावळे दिसायचे इतकी ती शत्रूच्या मनात दहशत होती.
एकाने रावणाच्या तावडीतून बुद्धीचातुर्याने आपली सुटका करून घेतली तर एकाने त्या आग्रा तुन औरंगजेबाच्या तावडीतून.
एकाने जानकी माता रावणाच्या तावडीतून मुक्त केली.तर एकाने असंख्य जानकी माता त्या रावणरुपी औरंग्या अफझुल्ल्या, शहिस्त्या रुपी हिरव्या अजगराच्या मगरमिठीतून हा महाराष्ट्र मुक्त करत अवघा हिंदुस्थान च या त्रासातून मुक्त करण्यासाठी सतत झुंजत राहिलेला.
दोघांचीही धाव उत्तरेकडे च मग ते महाभारत कालीन इंद्रप्रस्थ असो वा शिवकालीन आग्रा ,दिल्ली असो...
दोघांचेही स्वप्न रामराज्य आणण्याचे...
दोघांनाही भगव्याला कवटाळायाचे होते..हनुमंत रायांना भगव्या सुर्यबिंबाला.
तर शिवरायांना परमपवित्र भगव्या ध्वजाला कायम फडकवत ठेवायचे होते.
एकाने आपल्या भीम पराक्रमाने रावणाची सोन्याची लंका जाळली होती.
फोटो साभार - फेसबुक
तर दुसर्याने त्या हिरव्या अजगराच्या छाताडावर पाय देऊन त्या रायगडावर च शिवलंका उभारली होती.
फोटो साभार - फेसबुक
दोघांनीही आपल्या धैर्य ,चातुर्य, पराक्रमाने विद्युत लहरीने सारे शून्य भूमंडळ भेदून कोटींची उड्डाणे घेतली होती...
एवढं असूनही दोघांनीही सकल सुखांचा त्याग करीत आपल्या ध्येययाप्रति एकनिष्ठ...
दोघेही सारखेच शोकहारी..
न कसलाही स्वार्थ... न कसला गर्व ...!
दोघेही परम वंदनीयच...!
दोघेही चिरंजीवच...!
या सृष्टीच्या अंतापर्यंत आपल्या पराक्रमाच्या जोरावर सर्वांच्या हृदयात अधिराज्य गाजविणारे अन संकटांना मात देण्यासाठी त्यावर जय मिळविण्यासाठी सदैव प्रेरणा देणारेच..
एकाच वर्णन करताना श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात.
फोटो साभार - गुगल
सत्राने उड्डाण हुंकार वदनी ।
करी डळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी ।।
कडाडिले ब्रम्हांड धोका त्रिभुवणी ।
सुरवर निशाचर त्या झाल्या पळणी ।।
तर दुसऱ्याच वर्णन करताना .
निश्चयाचा महामेरू ।
बहुत जणांसी आधारू ।।
अखंड स्थिती चा निर्धारु ।
श्रीमंतयोगी...श्रीमंतयोगी...श्रीमंतयोगी..।।
अशा या थोर चिरंजीवी परमात्म्यांच्या च्या चरणी कोटी कोटी वंदन...
महाराष्ट्र भूषण
Comments
Post a Comment