कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सदगुरू गोदड महाराजांच्या पुण्यतिथी च्या दुसऱ्या दिवशी पालखी उत्सव का साजरा केला जातो..?
दरवर्षीप्रमाणे येत्या माघ कृष्ण चतुर्थी ला कर्णग्राम कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सद्गुरू गोदड महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने भंडारा उत्सव समाधी मंदिरामध्ये साजरा केला जातो...पण हा उत्सव का साजरा केला जातो काय यामागची आख्यायिका आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत... या पृथ्वीतलावरील आपले ऐहिक कार्य समाप्त झाल्यांनंतर योगी महापुरुष आपल्या देहाचा त्याग करतात...योग संपन्न असल्या कारणाने योगी महापुरुषांचे या जगतात येणे अन जाणे त्यांच्या हातात असते.... पाचांसहित लयातीत जालिये वो | अनुसरले प्रेमभक्ति काळ्या रूपासि वो || वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा पाया म्हणजे माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज... त्यांनी सुद्धा संजीवन समाधी च घेतली .... श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी ही संजीवन समाधी आहे.....समाधी म्हणजे काय..? तर योग्याच्या समाधीमध्ये पंचमहाभूतांपैकी पृथ्वी व जल हे तत्त्व झडून जाते व तो योगी वायुरूपाने अथवा तेजोरूपाने उरतो.... ज्ञानेश्वर माऊलींनी मात्र आपण पंचमहाभूतांसहित लयातीत म्हणजे अमर झालो आहोत असे सांगितले आहे... ज्ञानदेवें घेतले दान | ह्रदयी धरूनिया...