पवित्र मानली जाणारी अक्षय तृतीया आणि तिचे महत्व

 

 अतिशय पवित्र मानली जाणारी अक्षय तृतीया आणि तिचे महत्व  





काय आहे अक्षय तृतीया..?

भारतात हिंदू धर्मात महत्वाचे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून एक मानला जाणारा मुहुर्त म्हणजेच अक्षय तृतीया. हिंदू धर्म ग्रंथानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया.यावर्षी ची अक्षय तृतीया इंग्रजी कॅलेंडर नुसार शनिवार दि.22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजून 48 मिनिटांनी सुरू होईल आणि याची समाप्ती रविवार दि.23 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजून मिनिटांनी होईल.

याच्या नावातच अ-क्षय म्हणजेच कधीही न संपणारा म्हणूनच या मुहूर्ताला अनन्य साधारण महत्व आहे.यादिवशी दानधर्म,पितरांचे पूजन, जप नाम केल्यास हा मुहूर्त अक्षय आणि  लाभदायक फळ देतो असे मानले जाते.यादिवशी धर्मकार्य,नवीन खरेदी वगैरे,गुंतवणूक यासाठी देखील लाभदायक आहे स्कंदपुराण , विष्णुपुराण , मत्स्यपुराण, यासारख्या विविध हिंदू धर्मग्रंथामध्ये याबाबत विस्ताराने विशेष माहिती वाचायला मिळेल.


हिंदू धर्म ग्रंथानुसार अक्षय तृतीयेचे महत्व 
  • विशेषतः याच अक्षय तृतीया दिवशी भगवान श्री विष्णू ने विश्वाची निर्मीतीला सुरुवात केली होती असे हिंदू धर्म ग्रंथानुसार मानले जाते त्यामुळे हा महिना भगवान श्री विष्णू ला प्रिय असल्याने या दिवशी लक्ष्मीपूजन देखील केल जाते.
  • या दिवशीच महर्षी वेद व्यास यांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली
  • तसेच दिवशी भगवान विष्णू चा सहावा अवतार मानले जाणारे भगवान श्री परशुराम यांचा देखील जन्मदिवस असतो.भगवान परशुराम समर्पणाच्या बाबतीत किती तीव्र आहेत हे आपणास माहिती आहेच यादिवशी त्यांची पूजा केली जीवनात सुख समृद्धी सनी समाधान प्राप्त होते असे मानले जाते.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच दिवशी भगिरथाने  गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर आणली.हिंदू धर्मग्रंथानुसार गंगा नदीमध्ये स्नान केल्याने सर्व पापे धुवून निघतात अशी मान्यता आहे  म्हणून यादिवशी अनेक लोक गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी देखील जातात.

अक्षय तृतीयेला काय करावे..?

  • यादिवशी सकाळी पहाटे लवकर उठून स्नान करावे.
  • भगवान विष्णू माता लक्ष्मी ची पूजन करावे.
  • यादिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र घातले तर उत्तमच.
  • अक्षय तृतीया दिवशी सोने,चांदी खरेदी केले तर सौभाग्य आणि समृद्धीमध्ये भर पडते तसेच हे सोने चांदी अक्षय टिकते म्हणून या दिवशी सोने खरेदीसाठी झुंबड उडालेली असते.

मित्रानो या लेखतील माहिती उपयुक्त वाटल्यास लेख शेअर जरूर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा. 

तसेच आणखीन कोणत्या विषयावर आपणास माहिती हवी आहे ते पण आम्हाला कळवा.






Comments

Popular posts from this blog

मोबाईलवरून पैसे कसे कमवायचे? | Online Earning Marathi Guide

घरबसल्या पैसे कमवण्याचे 10 खात्रीशीर मार्ग (2026 अपडेट)

सरकारी योजना 2026: सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या 10 महत्वाच्या योजना । मराठी माहिती