राशीनची आई देवी येमाई ( जगदंबा )
राशीनची आई देवी येमाई ( जगदंबा )
![]() |
| जगदंबा देवी |
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असणारे राशीन हे एक ऐतिहासिक गाव आहे आणि समस्त राशीन पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे तसेच महाराष्ट्रातील बऱ्याच अंशी लोकांचे प्रमुख कुलदैवत म्हणून ओळखले जाणारे, ऐतिहासिक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले तसेच राशीन नगरीच्या सांस्कृतिक, वैभवशाली वारशाचे प्रतीक म्हणजे श्री येमाई माता मंदिर म्हणजेच श्री जगदंबा माता मंदिर आहे.
![]() |
| फोटो साभार फेसबुक |
हे मंदिर साधारणतः 1500 ते 1800 वर्षांपूर्वी चे आहे असे स्थानिक लोकांकडून सांगितले जाते.हे मंदिर या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी कलाकृती मध्ये करण्यात आलेल आहे.तसेच हे मंदिर इ.स.1704 ते 1710 या काळात अकोबा शेटे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.मंदिराचे बांधकाम अतिशय लक्षवेधी आहे त्यावरील नक्षीमकाम नुसतं बघू च वाटत असच आहे.
जगदंबा देवी चा ऐतिहासिक संदर्भ
अस म्हणतात की जगदंबा देवी ची मूर्ती स्वतः प्रकट झालेली म्हणजेच स्वयंभू आहे.आई जगदंबा देवी ने नवरात्रीमध्ये महिषासुराशी 9 दिवस युद्ध करून त्याचा नाश केला त्यापैकी च हे एक स्थान आहे.
- अशी ही एक कथा सांगितली जाते माता सीतेला रावणाने पळवून नेल्यावर श्री राम माता सीतेच्या विरहात होते त्यावेळी माता पार्वतीने सीतेच्या रुपात येऊन श्रीरामांच्या गंमत केली तेव्हा श्री रामाने माता पार्वतीला ये - माई म्हणून हाक मारली त्यामुळं या देवीला ये माई देखील म्हणतात तर काही जण रेणुका माता सुद्धा म्हणतात.देवीच्या उजव्या बाजूला तुकाई हे तुळाजापुरचे स्थान आहे. मध्ये चतुश्रृंगी देवीची पंचधातुची मूर्ती आहे.
मंदिराचे वैशिष्ट्य
- देवीचे मंदिर गावाच्या दक्षिणेला असून त्याचे प्रवेशद्वार पूर्वेकडे तोंड करून आहे.प्रवेश द्वारा तुन आत प्रवेश केल्यावर एक मोठा सिंह मंदिराच्या बाहेर उभारण्यात आलेला आपणास दिसतो.
- मंदिराच्या समोर दोन भव्य दीपमाळा आपल्याला दिसून येतात. या दीपमाळा हाताने हलविल्यास हलतात.
- मंदिराच्या बाजूला च सर्व बाजूनी भव्य अशा दगडी ओवऱ्या आहेत.
- मंदिराच्या उजव्या बाजूला पाण्याचे कुंड आहे.
- तेथील काही ओवऱ्यांमध्ये देवी देवतांचे मूर्ती आहेत.
- त्या ओवऱ्यांमध्ये एक शिलालेख आपणास वाचायला मिळेल.
देवीची यात्रा उत्सव
- राशीन गावचा श्री जगदंबा देवीचा यात्रा उत्सव नवरात्री मध्ये आश्विन शु. १ ते आश्विन पौर्णिमेपर्यंत असतो.
- तसेच अश्विन शु.पौर्णिमेला भद उत्सव ही परंपरा नुसार चालत आलेला उत्सव भाविकांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.



Comments
Post a Comment