हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्ताने कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सदगुरु गोदड महाराज मंदिरात जागतिक भविष्यवाणी २०२३ - २४ चे वाचन
मंदिरावर उभारलेली गुढीपाडव्याची पारंपरिक गुढी हिंदू धर्म ग्रंथानुसार हिंदू नववर्षाची सुरुवात ही चैत्र शुद्ध प्रतिपदेला होते ब्रम्हदेवाने सृष्टीला चालना दिली आणि तेथूनच सगळं जीवन चैतन्य सुरू झाले चालना दिल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा सूर्योदय झाला तेव्हा दिवसाची सुरुवात होते म्हणून गुढीपाडव्याला सूर्योदयाची गुढी उभारली जाते गुढी हे विजयाचे प्रतीक आहे आनंदाच प्रतीक आहे म्हणून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गुढी उभारली जाते. संतांनी सुद्धा गुढी चा उल्लेख आपल्या अभंगांमध्ये केलेला आहे.. ज्ञानेश्वरी अध्याय / चौथा अधर्माची अवधी तोडी । दोषांची लिहिली फाडी । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।। ५० ।। - श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्री तुकाराम गाथा अभंग क्र. ४५२९ आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढलीया ।। १ ।। पुढे पाठविले गोविंदें गोपाळा । देऊनी चिपळ्या हाती गुढी ।। २ ।। हाका आरळीया देऊनी नाचती । एक सदावीती हरी आले ।। ३ ।। आरंधी पडली होती तया ...