Posts

Showing posts from September, 2022

महाराष्ट्रात उभा राहणारा फॉक्सकॉन वेदांता चा सेमिकंडक्टर बनविण्याचा प्रकल्प गुजरातला उभा राहणार

Image
महाराष्ट्रात उभा राहणारा फॉक्सकॉन - वेदांता चा सेमिकंडक्टर बनविण्याचा प्रकल्प गुजरातला उभा राहणार..! Foxconn-Vedanta's semiconductor manufacturing project standing in Maharashtra will stand in Gujarat..!                        pics by facebook फॉक्सकॉन - वेदांता नुकतंच हे प्रकरण महाराष्ट्रासह देशात गाजत आहे तब्बल १ लाख ५८ हजार कोटींचा हा प्रकल्प महाराष्ट्रात पुण्याजवळ तळेगाव येथे उभा राहणार होता प्रचंड मोठ्या प्रमाणात यातून युवकांना रोजगारनिर्मिती होणार होती पण हा मंजूर प्रकल्प अचानकपणे गुजरात ला शिफ्ट झाला आहे त्यातील कारणं काय आहेत ते संबंधित सरकार मग ते आताचे असो किंवा मागचे दोन्ही सुद्धा कारणीभूत असतीलही त्यात आपल्याला पडायचं नाही पण एवढा मोठा अन महाराष्ट्रातील रोजगार निर्मिती चा प्रश्न सोडवणारा हा प्रकल्प गुजरातला गेला त्यामुळं आपला महाराष्ट्र मात्र यामुळे पुन्हा विकासाच्या अन रोजगाराच्या बाबतीत त्याच कासवगतीवर आला आहे हे मात्र नक्की आहे...! फॉक्सकॉन ही करार उत्पादक कंपनी एप्पल या मोबाईल कंपनीसाठी एप्पल फो...

दिल्लीमधील राजपथाचे नाव आजपासून कर्तव्यपथ

Image
दिल्लीमधील राजपथाचे नाव आजपासून " कर्तव्यपथ.. नवी दिल्ली - नवी दिल्ली येथील राजपथ असलेला संपूर्ण परिसर हा   "कर्तव्यपथ"   म्हणून ओळखला जाणार असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्रसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचं अनवारण करत या राजपथाला कर्तव्यपथ हे नाव घोषित केले आहे...एनडीएमसी च्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे... नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून असणारा राष्ट्रपती भवनापर्यंत चा संपूर्ण परिसर आता कर्तव्यपथ म्हणून ओळखला जाणारा आहे...   छायाचित्र - फेसबुक साभार यातून भारतीयांना कर्तव्याप्रति आपल्या राष्ट्राप्रति असलेल्या कर्तव्याची जाणीव होण्याचं काम नक्की होणार आहे आपला भारत देश नक्कीच बदलत चालला आहे आणि हा बदल घडत आहे कारण या देशाच सूत्र अशा माणसाच्या हातात आहे जो देशासाठी च जगतोय अन देशासाठी च मरायचा ज्याने आपल्या जीवनाचा उद्देश ठेवला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भारताला लाभलेले आहेत... छायाचित्र - फेसबुक साभार आपला भारत देश एका नव्या वाटेने साकार होत आहे बदलत आहे ...

परार्थाय जीवन त्याचे तेवी हो मदीय मातृभूमीसाठी माझे सर्व काही होय

Image
परार्थाय जीवन त्याचे तेवी हो मदीय मातृभूमीसाठी माझे सर्व काही होय...   छायाचित्र - फेसबुक साभार श्री संभाजीराव भिडे गुरुजी  हे नाव संबंध महाराष्ट्राला माहितीच आहे.... त्यांचा त्याग समर्पण संबंध अखंड हिंदुस्थान मधील तरुण पिढी ही शिवाजी संभाजी रक्तगटाची करण्यासाठी अहोरात्र झटणारा माणूस ...ना कसली अपेक्षा न कसला स्वार्थ ना कसलं भय .....  श्री शिवरायांच्या स्वत्व स्वाभिमान विसरून मोडलेल्या या महाराष्ट्राला पुन्हा जात पात पक्ष संप्रदाय यांच्या जोखडातून बाहेर काढत महाराष्ट्रातील नवतरुण पिढी ही देव देश धर्मासाठी अखंडितपणे भगव्या श्री शिवाजी - श्री संभाजी रक्तगटाची करण्यासाठी झटणारा अवलिया माणूस... या सह्याद्रीचे गडकोट असंख्य मावळ्यांचे प्रेरणास्थान असणारे समाधीस्थळ जे की आज दुर्लक्षित होत आहेत त्या ठिकाणी जिथं जिथं हे प्रेरणास्थळ शौर्यस्थळ आहेत त्या सर्व ठिकाणी याच गुरुजींचे शिष्य नित्यनियमाने दिवाबत्ती पूजा अर्चा करतात...एवढंच काय हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज श्री रायगडावर श्री शिवछत्रपतींच ३२ मण सोनं असलेल सुवर्ण सिंहासन अवघ्या हिंदुस्थान ...

सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनावरून चाललेलं गोंधळ नक्की विचार करायला लावणारा आहे

Image
सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनावरून चाललेलं गोंधळ नक्की विचार करायला लावणारा आहे                image_titel पैसा च सगळं काही नाहीय हे खरं आहे.. पण पैशाशिवाय सुद्धा काही चालत नाहीय हे पण तितकच १००१ % खरं आहे..त्यामुळं नीतीने तत्वाने अन कष्टानचं योग्य मार्गानेच पैसा पण कमविणे गरजेचं आहे..आणि तो सन्मार्गी लावणे पण तितकाच गरजेचं आहे.. नुकतच घडलेलं प्रकरण म्हणजे टाटा सन्स चे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचा कार अपघात झाला त्यात ते मरण पावले..त्यावर विविध माध्यमांवर विविधी प्रकारे चर्चा चालू च आहे त्यात सोशल मीडिया वर देखील त्यांच्या संपत्ती मुळे त्यांच्यावर टीका होत आहे...टीका करणारे दीड शहाणे तब्बल ७० कोटी एवढी मोठी संपत्ती असणारा माणूस शेवटी मरताना काय नेलं..? कसा मेला...? अस अस्स झालं न तस्स झालं...अशा प्रकारच्या टीका करत आहेत पण या साऱ्या बाष्कळ गप्पा आहेत हे समजून घ्या... आपल्याकडे जर पैसा च नसेल जवळ तर साधं काळ कुत्र पण विचारत नाही आजच्या काळात योग्य प्रकारे कष्टाने मिळविलेला पैसा संपत्ती ही कधीही कमी होत नसते अन ती कमविली च पाहिज...

होतं नव्हतं सारं गेलं पण देशसेवा कणभर ही कमी होऊ दिली नाही - The Rocketry scientist नंबी नारायण यांची जीवनगाथा

Image
होतं नव्हतं सारं गेलं पण देशसेवा कणभर ही कमी होऊ दिली नाही - The Rocketry scientist नंबी नारायण यांची जीवनगाथा     image_titel होय ते एका योध्यासारख च जीवन जगले...मित्रांनो आपल्याला माहिती च आहे की आपल्या देशाच्या विकासासाठी शस्त्रज्ञाच किती योगदान आहे..मग ते मंगळावर आपलं यान उतरविणे असो किंवा चंद्रावर भारतीय शास्त्रज्ञ आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तन मन धनाने ती विजयश्री खेचून आणतात च...आपल्या भारत देशाची सगळ्यात मोठी अंतराळ संस्था ISRO ( Indian Space Research Orgnaigetion ) ही काम करते आहे..त्यांनी प्रत्येकवेळी आपल्या भारताची मान जगाच्या पाठीवर नेहमीच उंचावली आहे..आज आपण त्यातील च एका महान श्री.नंबी नारायण या शास्त्रज्ञाच्या संघर्षमय जीवनाच्या अथक परिश्रमाची माहिती घेणार आहोत... इ.स.१९९४ मध्ये नंबी नारायण यांच्यावर क्रायोजिनिक टेकनिकल जे भारतासाठी बनविले होते ते पाकिस्तान ला विकले म्हनून त्यांच्यावर आरोप झाला होता त्यावर त्यांना अटक सुद्धा झाली होती..त्यामध्ये त्यांना तब्बल ५० दिवस विनाकारण जेल मध्ये काढावे लागले..त्यानंतर १९९५ मध्ये ही केस CBI ...

भारतीय नौदलाचं नवीन चिन्ह छत्रपती शिवरायांची राजमुद्रा

Image
भारतीय नौदलाचं नवीन चिन्ह छत्रपती शिवरायांची राजमुद्रा...! आजचा दिवस भारतीय नौदल आणि मराठी माणूस यांच्यासाठी खास च आहे म्हणावं लागेल कारण भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारतीय नौदल सेनेचे चिन्ह हे राजमुद्रा म्हणून घोषित केले आहे. अवघ्या हिंदुस्थान चे प्रेरणास्थान असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि भारतीय आरमाराचे जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या छत्रपती श्री शिवरायांच्या राजमुद्रेला नौदल चिन्हाचा मान देऊन एक वेगळा इतिहास घडवला आहे...त्याचे आज अनावरण करण्यात आले. नौदलाचा हा नवा ध्वज भारतीय जवानांना एक नवी ऊर्जा देईल आणि आजपासून नौदलामध्ये हा नवा ध्वज फडकविला जाईल..असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदि यांनी हा ध्वज छत्रपती श्री शिवरायांना समर्पित असल्याचे म्हटले आहे.