मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे कै.आमदार रमेश लटके यांच्या पत्नी च्या उमेदवारी संदर्भात उपमुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे कै.आमदार रमेश लटके यांच्या पत्नी च्या उमेदवारी संदर्भात उपमुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र चित्र - फेसबुक साभार नुकतंच आमदार कै. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी पूर्व या जागेसाठी पोट निवडणूक लागली आहे तिथे त्यांची पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे..त्यासाठी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे ... प्रिय मित्र देवेंद्र ,सस्नेह जय महाराष्ट्र ! एक विनंती करण्यासाठी हे पत्र आपणास लिहिले आहे आमदार कै. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी पूर्व या जागेसाठी पोट निवडणूक लागली आहे तिथे त्यांची पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.. कै.रमेश लटके एक चांगले कार्यकर्ते होते अगदी शाखा प्रमुखांपासून त्यांची वाटचाल सुरू झाली.त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे.त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्यानं कै रमेश लटके यांच्या आत्म्याला शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षाने ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या प...