Posts

Showing posts from June, 2022

अमरसिंहचे गोदडनाथ कसे झाले

Image
    अमरसिंह चे गोदड नाथ कसे झाले ..?     गुरुविण कोण दाखवील वाट..... चांगला गुरू यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने स्वतःलाच चालावे लागते. नारळाचे मजबूत कवच फोडल्या शिवाय आतमधील अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही, त्याचप्रमाणे प्रगतीच्या मार्गावर येणाऱ्या संकटावर मात केल्याशिवाय यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा कारण नियती संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देत असते ज्यांच्या मध्ये क्षमता असते. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे, तो न घाबरता मान्य करावा . जीवनात सर्वात मोठा गुरू हा येणारा काळ असतो. कारण काळ जे शिकवतो ते कुणीही शिकवू शकत नाही. सद्गुरूंची भेट होईपर्यंत मात्र आपण आपल्याकडून नामस्मरण करीत राहणे आवश्यक आहे कारण ते नामस्मरणच आपल्याला सदगुरूची भेट करवून देईल. तसे पाहता आधी संताची भेट होणे कठीण; समजा भेट झाली तरी त्याच्यावर विश्वास बसणे त्याहून कठीण असते. म्हणून नामाचे साधन चालू ठेवावे. खडीसाखर ठेवली म्हणजे मुंगळयांना आमंत्रण करावे लागत नाही ते आ...

पंढरीची वारी आणि श्री संत सदगुरु गोदड महाराज

Image
    पंढरीची वारी आणि श्री संत सदगुरु गोदड महाराज     पंढरीची वारी आणि श्री संत सद्गुरू गोदड महाराज...! युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।। पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा । २८ युगे उभा असणे म्हणजे काय   १. सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि अशा चार युगांचे एक चक्र, म्हणजेच एक फेरा होतो. सध्या पृथ्वीतत्त्वाचा सातवा फेरा चालू आहे. ७ x ४ = २८. सध्या २८ वे युग चालू आहे. विठ्ठल २८ युगांपासून उभाच आहे. २. ४ वेद, १८ पुराणे आणि ६ शास्त्रे यांची बेरीज २८ असणे आणि त्यांनी पांडुरंगाचे गुणगान करणे : ४ वेद, १८ पुराणे आणि ६ शास्त्रे यांची बेरीज २८ होते; म्हणून विठ्ठल ‘युगे अठ्ठावीस’ उभा आहे; कारण हे सर्व (वेद, पुराणे आणि शास्त्रे) त्याचेच गुणगान करणारी आहेत.’ ‘विठ्ठल २८ युगांपासून उभा आहे, असे म्हटले आहे. ‘उभा आहे’, याचा अर्थ विठ्ठल २८ युगांपासून निर्गुण स्वरूपात, म्हणजेच तत्त्वरूपाने कार्यरत आहे. यावरून विठ्ठलाचे अनादित्व लक्षात येते.’        सध्या महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे आणि त्याचे कारण...