आता गाय म्हैस घेण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 90 टक्के अनुदान राज्य सरकारची योजना

 

आता गाय म्हैस घेण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदान राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी नवी योजना

Gaay Mahis Anudan Yojana





महाराष्ट्र भूषण ऑनलाईन ।

होय आता शेतकऱ्यांना गाय म्हशी घेण्यासाठी मिळणार  राज्य सरकारकडून अनुदान तेही 90% पर्यंत.
राज्य सरकारकडून शेतीला पूरक असणारा दूध धंद्यात वाढ व्हावी शेतकऱ्यांना शेतीला पर्यायी व्यवस्था निर्माण होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक हातभार निर्माण होण्यासाठी मदत व्हावी म्हणून ही योजना अंमलात आणली जात आहे.

Gaay Mahis Anudan Yojana

  • काय आहे ती योजना..?
  • कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो ..?
  • यासाठी किती अनुदान मिळते..?
  • यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती 
1. काय आहे ही योजना..?

राज्यातील शेतकर्यांना शेतीला जोड धंदा मिळावा व नवीन व्यवसायिक तयार व्हावेत या साठी पशुसंवर्धन विभागातर्फे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना  दुधाळ जनावरे घेण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत दुधाळ जनावरे घेण्यासाठी पॅनल तयार करण्यात येत आहेत.ज्यांना दुधाळ जनावरे घ्यायची आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करणे गरजे चे आहे.जनावरांच्या किमतीमध्ये वाढ होत चालल्याने या योजनेची मिळणाऱ्या रकमेत सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळं याचा शेतकऱ्यांना भरपूर फायदा होणार आहे.

या योजनेअंतर्गत आपण संकरित गाय याच्यात जर्सी गाय, मुरा म्हैस,जाफराबादी म्हैस, देशी गाय ,साहिवाल गाय,रेड सिंधी राठी थापरकर लाल देवणी गाय,लाल कंधार गाय,गवळाऊ गाय, डांगी गाय इ प्रकारचे जनावरे खरेदी करू शकता.

ही योजना 2023 - 2024 या आर्थिक वर्षात मुंबई मुंबई उपनगर आहे तसेच दुग्ध उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण असलेले जिल्हे सातारा,पुणे,सोलापूर,सांगली तसेच अहमदनगर जिल्ह्यात राबविली जाणार नाही.


आता शेतकऱ्यांना मिळणार थेट 3 लाख रुपये बिनव्याजी पीक कर्ज  


2.कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतात..?

महिला बचत गट
अल्पभूधारक 1 हेक्टर ते 2 हेक्टर
सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नावनोंदणी असल्यास प्रथम प्राधान्य)



3.किती अनुदान मिळते..?

या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना 75% अनुदान दिले जात आहे.
तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50% अनुदान दिले जात आहे.


4.यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती ..?

  • फोटो ओळपखपत्राची सत्यप्रत
  • सातबारा ( सातबारावर लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र अथवा दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर असल्यास करारनामा अनिवार्य )
  • 8 अ उतारा
  • अपत्य दाखला स्वयंघोषणापत्र
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • दारिद्रय रेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा
  • शैक्षणिक पात्रता दाखला

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग येथे चौकशी करावी तसेच ऑनलाईन अर्ज भरण्याच्या ठिकाणी जाऊन या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली नावनोंदणी करून घ्यावी.

Comments

Popular posts from this blog

मोबाईलवरून पैसे कसे कमवायचे? | Online Earning Marathi Guide

घरबसल्या पैसे कमवण्याचे 10 खात्रीशीर मार्ग (2026 अपडेट)

सरकारी योजना 2026: सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या 10 महत्वाच्या योजना । मराठी माहिती