Posts

Showing posts from December, 2020

या दुनियेत प्रेमाला नाही तर पैशाला किंमत आहे

Image
        या दुनियेत प्रेमाला नाही तर पैशाला किंमत आहे      "आईवडिलांना आपल्या प्रेमाबद्दल सांगण्याची तिची हिंमत होत नव्हती......." त्यात दोघांची जात देखील वेगळी, शेवटी त्या संध्याकाळी त्याने अन  तिने दोघांनी ही हिंमत करुन घरी सगळं सांगितलच.....     हे " ऐकताच " तिच्या आईने जोरजोराने डोक्यावर हात मारून घ्यायला सुरूवात केली. वडिल शांत बसले होते. त्यांनी मुलगा काय करतो याची विचारपूस केली. तो अजून तितका सेटल नव्हता आणि स्वतःच घरदेखील नव्हतं. लग्नानंतर तिला गावाकडील घरी राहावं लागलं असतं. आयुष्यभर ति शहरात वाढलेली , तिला गावाकडे वगैरे राहणं जमलं नसतं. त्यामुळे वडिलांनी नकार दिला.....      ति रूसून बसलेली पाहुन, आईने स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करुन घेईल अशी तिला धमकीच देऊन टाकली....आता मात्र ति अजुनच घाबरली....आईचं आकांडतांडव बघून तिचं डोकं बधीर झालं होतं.... अनेक दिवस जाऊनही घरच्यांचा निर्णय बदलत नव्हता. दिवसेंदिवस घरातील वातावरण अजुनच गढुळ होत चाललेलं. शेवटी तिने त्याला फोन केला आणि  " नातं  "तोडण्याचा निर्णय...

श्री संत सदगुरु गोदड महाराज समाधी सोहळा विशेष लेख

Image
          श्री संत सदगुरु गोदड महाराज समाधी सोहळा विशेष लेख     कर्जत म्हणजेच " कर्णग्राम " या पवित्र भूमीमध्ये एका विठ्ठल भक्ताचा जन्म झाला अन त्यांनि संजीवन समाधी सुद्धा इथेच घेतली...त्याबद्दल चा विशेष लेख              ज्याप्रमाणे महाभारतामध्ये एक प्रसंग घडला होता कुरुक्षेत्रावर कौरव-पांडव यांच्यामध्ये युद्ध चालू होते.      अर्जुनाच्या अनुपस्थितीत कौरवांनी चक्रव्यूह रचला. त्यामध्ये अर्जुनपुत्र वीर अभिमन्यू सहजगत्या शिरला; परंतु तेवढ्याच सहजतेने तो बाहेर मात्र पडू शकला नाही.            शेवटी त्यातच त्याला वीरमरण आले. त्याच्या मृत्यूनंतर कौरव सैन्यातील द्वेषाने पछाडलेल्या जयद्रथाने अभिमन्यूच्या मस्तकावर लाथ मारली. अभिमन्यूच्या मृत्यूची वार्ता ऐकून अर्जुन पुत्रशोकाने व्याकुळ झाला. त्याहीपेक्षा त्याला संताप आला, तो जयद्रथाच्या घृणास्पद कृत्याचा! अर्जुनाने तात्काळ प्रतिज्ञा केली, ‘उद्या सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचा वध करीन, नाहीतर स्वत: अग्नीभक्षण करीन!’ हे...

शिवाजी असे मंत्र हा शक्तिदाता

Image
   शिवाजी असे मंत्र हा शक्तिदाता           २० वर्षात मेहनत करून कमावलेले एका वर्षात ९०% पेक्षा जास्त गमवावे लागते. शिवाय स्वतःचे आणि कुटुंबाचे आयुष्य पणाला लागून कॉम्पिटिटर च्या समोर जाऊन उभं रहावं लागतं. कॉम्पिटिटर पुढील सहा महिने हजार किलोमीटर दूरवर स्वतःच्या लोकेशन पासून दूर ठेवतो आणि त्या तरुणाला संपवण्याचा प्लॅन करतो.  केवढा धक्का! केवढं फ्रस्ट्रेशन!! केवढा सेटबॅक!!! तो ३६ वर्षांचा तरुण आत्महत्या करत नाही...त्या ही परिस्थितीत मनोधैर्य उंचावून आधी त्याची टीम बाहेर काढतो आणि मग स्वतः कॉम्पिटिटरच्या जाचातून सुटका करवून घेतो. पेशन्स ठेवत कंसिस्टंट मजल मारत स्वतःच्या लोकेशनवर पोहोचतो आणि  २० वर्षांच्या मेहनतीने उभारलेले जे गमावलं होतं ते पुढील फक्त १ वर्षात पुन्हा कमवतो इतकंच नाही तर कॉम्पिटिटर ला हि मोठे तडाखे देतो.. फ्रस्ट्रेशनचा उपाय सुसाईड नाही तर क्वांटम लीप मध्ये शोधणारा तो ३६ वर्षीय तरुण :  "छत्रपती शिवाजी महाराज" आणि तो झालेला सेटबॅक म्हणजे पुरंदर चा तह ज्यात 90% किल्ले छत्रपतींनी त्या औरंग्याला दिले. चार पाच पावले मागे आ...

छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले किल्ले संवर्धन करणे हे आपलं काम आहे

Image
    छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले किल्ले संवर्धन करणे हे आपलं काम आहे   कोल्हापूर चे युवराज छत्रपती संभाजी महाराज भोसले यांनी जिंजी किल्ल्याला भेट दिली जिंजी किल्ला हा महाराष्ट्रापासून दूर तामिळनाडू राज्यात आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पाऊलखुणा संपूर्ण देशभरात पसरलेल्या आहेत. त्याचं जतन, संवर्धन, आणि प्रसार करण्याची संपूर्ण जबाबदारी आपली आहे.       दक्षिण दिग्विजयावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ला ताब्यात घेतला. पुढे शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांवर स्वराज्याची जबाबदारी आली असताना आठ वर्षे राजाराम महाराजांनी जिंजी किल्ल्यावरुनच स्वराज्य सांभाळले. जिंजी किल्ला हा महाराष्ट्रापासून दूर तामिळनाडू राज्यात आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पाऊलखुणा संपूर्ण देशभरात पसरलेल्या आहेत. त्याचं जतन, संवर्धन, आणि प्रसार करण्याची संपूर्ण जबाबदारी आपली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.  काल जिंजी किल्ल्याला भेट दिल्यानंतर मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी याविषयी फोनवर सविस्तर चर्चा केली. य...

परस्त्री मातेसमानच हीच शिवरायांची शिकवण

Image
      परस्त्री मातेसमानच हीच शिवरायांची शिकवण     परस्त्रीमातेसमान...! धारकरी आम्ही मोहिमेवरून घरी जात होतो आमचा टेम्पो रसाळगडावरून चिपळूण मार्गे सातारा-फलटण-बारामती-कर्जत असा जाणार होता आमच्यातील काही धारकर्यांना सातारचे प्रसिद्ध कंदी पेढे घ्यायचे होते म्हणून आमचा टेम्पो आम्ही सातारा मधील फलटण फाट्यावर थांबवला होता रात्रीचे 11.30 वाजले होते ज्यावेळी आम्ही त्या फाट्यावर गाडी थांबवत होतो तिथ फाट्यावर काही 5 6 महिला फलटण ला जाण्यासाठी गाडीची वाट बघत होत्या आमच्या पण गाडीला त्यांनी हात केला आम्हालाही थांबायचं होत थोडा वेळ म्हणून आम्ही रस्त्याच्या कडेला गाडी पार्क केली आम्ही उतरतच होतो त्यातील काही महिला आमच्याकडं आल्या आम्हाला म्हणल्या आम्हाला फलटण ला जायचं आहे 2 तास झालं आम्ही थांबलो आहोत पण कोनि आम्हला गाडी थांबवत नाहीय आम्हला फलटण पर्यंत नेता का आमच्या टेम्पोत आधीच 25 30 जण होतो आम्ही त्यामुळं त्याना कुठ बसवायचं हा प्रश्न होता आधीच सगळे धारकरी 4 दिवस थकलेलं होते मग थोडा वेळ थांबा म्हणलं पोरांना काही मिठाई घायची आहे ती घेतली की करतो म्हणलं काहीतरी निय...

संत नामदेवांची समाधि

Image
 संत नामदेवांची समाधि ! शके १२७२ च्या आषाढ व. १३ या दिवशी पंढरीच्या विठ्ठलाच्या सगुण भक्तीचा प्रसार करणारे प्रसिद्ध भगवद्भक्त श्रीनामदेव हे समाधिस्थ झाले. तेराव्या शतकामध्ये महाराष्ट्रांत भक्तीचा जो डांगोरा पिटला जात होता, त्याचे बरेचसे श्रेय संत  नामदेवांकडे आहे. नगर जिल्ह्यांतील नेवासे गांवी याच काळी ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी अवतरली होती. पांडुरंगाचा निस्सीम सगुणभक्त नामदेव यांचेसह आपण तीर्थयात्रा करावी अशी प्रेरणा ज्ञानदेवांना झाली. आणि "तुझिये संगतीचे नित्य सुख प्यावें । सार्थक करावें संसाराचें ॥” असें नामदेवांना विनवून ज्ञानदेवादि मंडळींनी उत्तर हिंदुस्थानची तीर्थयात्रा पूर्ण केली. भागवत धर्माचा प्रसार साऱ्या भारतात झाला. परंतु नामदेवांची थोरवी आणखी एका दृष्टीने मोठी आहे. ज्ञानदेवादि भावंडांचे प्रयाण झाल्यावर नामदेव कांहीसे उदास झाले. उत्तरेत म्लेंच्छ राज्य होऊन धर्माचा -हास होत होता. ते पाहून संत नामदेव पांच पन्नास वारकऱ्यांसहित परत उत्तरेत गेले. पंजाबपर्यंत त्यांनी विठ्ठलभक्ति पोचविली ! हिंदी भाषेत कवनें केली, त्यांपैकी काही शीखांच्या 'ग्रंथसाहेबां'त संग्रहीत केलेली ...

कर्जतची गौरवशाली परंपरा रथोत्सव धाकट्या पंढरीचा

Image
  कर्जतची गौरवशाली परंपरा रथोत्सव धाकट्या पंढरीचा    कर्जत आमुचे पंढरपूर । गोदड नाथ रमावर ।।  श्री संत सदगुरू गोदड महाराजांनी लिहलेला हा अभंग त्याचा सार पण तसाच...!            महाराष्ट्रातील संत मंडळींपैकी कर्जत जि.अहमदनगर येथील श्री संत सदगुरु गोदड महाराज हे एक भगवान श्री पांडुरंगाचे निस्सीम भक्त वडील भिकाजीराजे आणि आई चंद्रभागा भोसले यांचे चिरंजीव असलेले अमरसिंह भिकाजीराजे भोसले हे महाराजांचं खरं नाव...! वयाच्या अवघ्या ७ ते 8 व्या वर्षी आपले सर्व राज पाठ राजवाडा आई वडील सोडून विठ्ठल नामात तल्लीन होऊन घराबाहेर पडले... त्यानंतर वनात फिरत फिरत असताना उदरनिर्वाह करण्यासाठी वनातील फळे खाऊन भूक भागवत असत... वडफळ उंबर फळ । खाऊनि गोपाळ आठविला ।। खाली पडलेलीच घ्यावी । झाडावरील न तोडावी ।। पिऊनी चंद्रभागेचे पाणी । गोदड नारायण चरणी ।।              सातपुडा पर्वतरांगांमध्ये फिरत तिथेच तप साधनेसाठी बसले ५ वर्ष तप केल्यानंतर उपाशी असलेल्या गोदडनाथांना श्री विठ...