छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले किल्ले संवर्धन करणे हे आपलं काम आहे

 

 छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले किल्ले संवर्धन करणे हे आपलं काम आहे

 

कोल्हापूर चे युवराज छत्रपती संभाजी महाराज भोसले यांनी जिंजी किल्ल्याला भेट दिली जिंजी किल्ला हा महाराष्ट्रापासून दूर तामिळनाडू राज्यात आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पाऊलखुणा संपूर्ण देशभरात पसरलेल्या आहेत. त्याचं जतन, संवर्धन, आणि प्रसार करण्याची संपूर्ण जबाबदारी आपली आहे.

 

 
 
दक्षिण दिग्विजयावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ला ताब्यात घेतला. पुढे शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांवर स्वराज्याची जबाबदारी आली असताना आठ वर्षे राजाराम महाराजांनी जिंजी किल्ल्यावरुनच स्वराज्य सांभाळले. जिंजी किल्ला हा महाराष्ट्रापासून दूर तामिळनाडू राज्यात आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पाऊलखुणा संपूर्ण देशभरात पसरलेल्या आहेत. त्याचं जतन, संवर्धन, आणि प्रसार करण्याची संपूर्ण जबाबदारी आपली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

काल जिंजी किल्ल्याला भेट दिल्यानंतर मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी याविषयी फोनवर सविस्तर चर्चा केली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिंजी किल्ल्यावरील छत्रपती राजाराम महाराजांच्या राजसदरेच्या संवर्धनासाठी व याठिकाणी मराठा हिस्ट्री गॅलरी उभारणीसाठी तात्काळ ५० लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहे. मा. मुख्यमंत्र्यांचे यासाठी विशेष आभार व्यक्त करतो.असेही ते यावेळी म्हणाले..
 
 
 



 

Comments

Popular posts from this blog

मोबाईलवरून पैसे कसे कमवायचे? | Online Earning Marathi Guide

घरबसल्या पैसे कमवण्याचे 10 खात्रीशीर मार्ग (2026 अपडेट)

सरकारी योजना 2026: सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या 10 महत्वाच्या योजना । मराठी माहिती