श्री संत सदगुरु गोदड महाराज समाधी सोहळा विशेष लेख

 
 
 
 

 श्री संत सदगुरु गोदड महाराज समाधी सोहळा विशेष लेख

 
 
कर्जत म्हणजेच " कर्णग्राम " या पवित्र भूमीमध्ये एका विठ्ठल भक्ताचा जन्म झाला अन त्यांनि संजीवन समाधी सुद्धा इथेच घेतली...त्याबद्दल चा विशेष लेख

             ज्याप्रमाणे महाभारतामध्ये एक प्रसंग घडला होता कुरुक्षेत्रावर कौरव-पांडव यांच्यामध्ये युद्ध चालू होते. 


 
 
अर्जुनाच्या अनुपस्थितीत कौरवांनी चक्रव्यूह रचला. त्यामध्ये अर्जुनपुत्र वीर अभिमन्यू सहजगत्या शिरला; परंतु तेवढ्याच सहजतेने तो बाहेर मात्र पडू शकला नाही. 
 
 
 
 

शेवटी त्यातच त्याला वीरमरण आले. त्याच्या मृत्यूनंतर कौरव सैन्यातील द्वेषाने पछाडलेल्या जयद्रथाने अभिमन्यूच्या मस्तकावर लाथ मारली.
अभिमन्यूच्या मृत्यूची वार्ता ऐकून अर्जुन पुत्रशोकाने व्याकुळ झाला. त्याहीपेक्षा त्याला संताप आला, तो जयद्रथाच्या घृणास्पद कृत्याचा! अर्जुनाने तात्काळ प्रतिज्ञा केली, ‘उद्या सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचा वध करीन, नाहीतर स्वत: अग्नीभक्षण करीन!’ हे ऐकताच कौरवसेना आणि जयद्रथ फारच घाबरले. जयद्रथाला वाचवण्यासाठी कौरवांनी त्याच्या भोवती महान योद्ध्यांचे कवच उभारले. दुपार टळत आली, सूर्यास्ताला फारसा अवधी उरला नाही आणि जयद्रथाचा तर कुठे पत्ता नव्हता.



इकडे श्रीकृष्णाला आपल्या भक्ताची काळजी वाटू लागली. त्यामुळे त्याने आपले सुदर्शनचक्र सिद्ध करून त्याच्या साहाय्याने सूर्यालाच झाकून टाकले. सर्वांना वाटले संध्याकाळ झाली, सूर्य मावळला. अर्जुन अग्नीभक्षण करण्याच्या सिद्धतेला लागला. त्याने लाकडे जमा केली. चिता पेटवली. त्यामुळे कौरवगण त्याची फजिती पहाण्यास जमले. जयद्रथही येऊन उभा राहिला. अर्जुनाने धनुष्य-बाण उचलले. नमस्कार केला आणि चितेत उडी घेणार, तेवढ्यात श्रीकृष्णाने आपले सुदर्शनचक्र काढून घेतले. त्यामुळे सर्वत्र सूर्याचा प्रकाश पसरला. ते पाहून कौरव सैन्याचा गोंधळ उडाला. जयद्रथ तर पुरता भांबावून गेला. इतक्यात कृष्ण अर्जुनाला म्हणाला, ”अर्जुना, पहातोस काय, लाव बाण तुझ्या धनुष्याला! हा बघ सूर्य आणि हा जयद्रथ!” कृष्णाचे ते शब्द आसमंतात घुमले. अर्जुनाने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या बाणांनी जयद्रथाचा शिरच्छेद केला.
 
 
 

     अगदी असाच प्रसंग श्री संत सदगुरू गोदड महाराज अन त्यांच्या परमशिष्या उमाबाई भिमाजीबुवा काकडे यांच्याबाबतीत घडलेला आहे ..

        पंढरपूर मध्ये झालेल्या मनःस्तापामुळे स्वतःला अग्निमध्ये झोकून द्यायला तयार झालेले महाराज त्याना प्रत्यक्ष भगवान पांडुरंगाने ब्राम्हणाच्या वेशात येऊन थांबवले अन सांगितले की  " तू तुझ्या जन्मगावी
 " कर्णग्रामी " म्हणजेच सध्याचे कर्जत येथे जाऊन समाधिस्त व्हावे ...." त्या आदेशानुसार महाराज आपल्या आजोळी मामाच्या गावी कर्णग्रामी आले अन इथे त्यांच्या शिष्या झाल्या त्या भिमाजीबुवा शिंपी काकडे यांच्या भक्तवत्सल पत्नी उमाबाई काकडे अन त्या महाराजांची सेवा करू लागल्या तिची भक्ती अन सेवा पाहून महाराज त्यांच्या च घरी राहू लागले...उमबाईसुद्धा आपल्या गुरूंची  निस्वार्थी  सेवा करत असत...


 उमाबाई भिमाजीबुवा काकडे

        असेच एके दिवशी आपल्या परमशिष्य असणाऱ्या उमाबाई यांची परीक्षा घेण्यासाठी महाराज भर दुपारी उमाबाई काकडे यांच्या वाड्यामध्ये आले उमाबाई ना हाक मारली " उमा कुठे आहेस मला खुप भूक लागली आहे जेवायला वाढ मला भूक सहन होत नाहीय.."
उमाबाई नेमक्या स्नान करण्यास बसल्या होत्या तोच आपल्या गुरूंचा आवाज ऐकला अन द्विधा मनस्थितीत पडल्या आता काय करावे जावं तर कस.. महाराजांना त्या म्हणल्या " महाराज मी स्नान करण्यासाठी बसले आहे मी बाहेर कस येऊ , अंगावर वस्त्र नाहींयत माझ्या .." महाराज म्हणले " मला काही एक सांगू नको मी भुकेने व्याकुळ झालो आहे मला जेवायला वाढ ..."
आता मात्र उमाबाई या अजून चिंतेत पडल्या आता गेले नाही तर गुरुआज्ञा मोडल्याच पातक लागेल म्हणून अजूनच दुविधा मनस्थिती मध्ये पडल्या ...
महाराजांनी त्यांची मनस्थिती जानून घेतली अन म्हणले तु निश्चिंत राहा ये बाहेर अन जेवायला वाढ मला...
मग काय उमाबाई पण मनाशी निर्धार करून बाहेर यायला निघाल्या ...तोच महाराजांनी सूर्याकडे आपला हात केला अन काय चमत्कार झाला भर दुपारी मध्यान्ही च्या वेळी सम्पूर्ण अंधकार झाल.
 
 

 
 
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश...|
ज्यापुढे उदास चंद्र रवी..||
 

उमाबाई आहे अशा अवस्थेत स्नानगृहाच्या बाहेर आल्या महाराजांना अत्यंत आवडीचा असणारा बोटव्याचा ( शेवयाचा ) भात अन गूळ चटणी ही लगेच स्वयंपाक घरात जाऊन करून खाऊ घातली महाराजांच पोटभर खाऊन झाल्यावर महाराजांची आज्ञा घेतली अन पुन्हा स्नानगृहामध्ये गेल्या ...
त्या स्नानगृहात गेल्यानंतर महाराजांनी आपला सूर्याकडे ठेवलेला हाथ बाजूला केला पुन्हा सगळीकडे भर दुपारसारखा च सूर्याचा प्रकाश पसरला ..
जेवण केल्यानंतर महाराज तृप्त झाले  आपल्या शिष्याने आपली सेवा निस्वार्थी भावनेने केली यावर ते प्रसन्न झाले तेव्हा पासून उमाबाई भिमाजी काकडे या श्री संत सदगुरू गोदड महाराजांच्या परमशिष्य झाल्या... ...महाराज उमाबाई काकडे यांच्या घरी राहू लागले .....
 

महाराज विश्रांती घेत असलेला पलंग

            काही दिवसानंतर महाराजांनी आपले मामा निळोजी व निंबाजी तोरडमल यांना आपल्या जवळ बोलवून घेतले आणि म्हणले " माझे अवतारकार्य पूर्ण झाले असून ,मी आता समाधी घेणार आहे ...! म्हणून तुम्ही आता समाधीस्थळ बांधण्यास सुरुवात करावी हे ऐकून निळोजी अन निंबाजीचे अंतःकरण दुःखी खूप झाले.. महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी समाधिकार्यास प्रारंभ केला ..
महाराज त्यांना म्हणाले ' मी आता २१ दिवसाचे  "अनशन व्रत " धारण करणार असून २१ व्या दिवशी देह ठेवणार आहे म्हणजेच समाधिस्त होणार आहे .. ' असे सांगून महाराजांनी आपल्या व्रतास सुरुवात केली योगासन घालून महाराज २१ व्या दिवशी म्हणजेच माघ वद्य चतुर्थी ,वार मंगळवार या दिवसाचा दुसरा प्रहर ,शके १७५९ ( इ.स.१८३७ ) या दिवशी समाधी अवस्थेतच देह ठेवला ..
 
 
 

          ही वार्ता गावात पसरल्यानंतर गावातील सर्व पेठकरी ,गावकरी, जमले सर्वांनी महाराजांना चौरंगावर बसवून स्नान घातले व त्यांचा देह उचलून समाधीस्थळी आणून दुसऱ्या चौरंगावर ठेवत पुढे नामघोष चालू होता.



ध्यान समाधी लावीली मूळ स्तंभि अनियिली ।
विठू अमुचा अंतकाळ आला फुलांचा वर्षाव झाला ।।

सर्वजण दुःखसागरात डुंबून गेले होते... महराजांच्या परमशिष्य उमाबाई यांना अतोनात दुःख झाले त्या सर्वांच्या पुढे आल्या व त्यांनी हातामधील दुधाचा प्याला महाराजांसमोर ठेवला हाथ जोडले व महाराजांना विनवणी करू लागल्या " हे दूध आपण प्राशन करावे ..."  अन चमत्कार झाला आपल्या व्याकुळ भक्ताची हाक ऐकून महाराजांनी आपले डोळे उघडले व दुधाच्या प्याल्यावर आपली दृष्टी टाकली त्या प्याल्यातील दूध महाराजांनी आपल्या दृष्टीने प्राशन केले ...हा सर्व प्रकार सर्व ग्रामस्थ व पेठकर्यांनी पाहिला त्या सर्वांना खूप आश्चर्य वाटले...
 
 
महाराजांच्या गळ्यातील भिमाजी बुवा यांना घातलेली तुलसी माळ
 

धन्य ती उमाबाई जिने महाराजांची निरंतर सेवा केली त्या सेवेच फळ म्हणून स्वतः महाराजांनी उमाबाई चे पती भिमाजीबुवा काकडे ( शिंपी ) यांचे नावे बक्षीस पत्र तयार करून ठेवले..



व त्या बक्षीसपत्रानुसार च आजतागायत भिमाजी बुवा काकडे शिंपी यांचे वारसदार निरंतर अव्याहतपणे निस्वार्थी भावनेने महाराजांची सेवा करतात...

स्वतः महाराजांनि भिमाजी बुवा ला सांगितले आहे " या गावी कर्णग्रामी माझे शिष्य बहुत आहेत पण माझी सेवा अन वारसा तू सांभाळायचा आहेस तुला तुझ्या पुढील पिढीला ही काही वेळा गावातील दूषित लोकांकडून त्रास ही होईल पण तू ठामपणे माझी निस्वार्थी सेवा कर...बाकी मी तुझा संसार सांभाळेल... अन कोण तुझ्या वाटेला गेले तर त्याच्याकडे माझं मी बघून घेईल..."

असे थोर योगी संन्यस्थ विट्ठल भक्त श्री संत सदगुरु गोदड महाराज कर्णग्रामी च जन्मले अन कर्णग्रामी च समाधिस्त झाले....

धन्य ते कुळ ,धन्य तो देश । जेथे हरीचे दास जन्म घेती ..."

बक्षिसपत्र 👇
 

✍️ सेवेच्या ठाई तत्पर सदगुरु चरणी निरंतर
गणेश पंढरीनाथ काकडे


Comments

Popular posts from this blog

मोबाईलवरून पैसे कसे कमवायचे? | Online Earning Marathi Guide

घरबसल्या पैसे कमवण्याचे 10 खात्रीशीर मार्ग (2026 अपडेट)

सरकारी योजना 2026: सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या 10 महत्वाच्या योजना । मराठी माहिती