कर्जतची गौरवशाली परंपरा रथोत्सव धाकट्या पंढरीचा
कर्जतची गौरवशाली परंपरा रथोत्सव धाकट्या पंढरीचा
कर्जत आमुचे पंढरपूर ।
गोदड नाथ रमावर ।।
श्री संत सदगुरू गोदड महाराजांनी लिहलेला हा अभंग त्याचा सार पण तसाच...!
महाराष्ट्रातील संत मंडळींपैकी कर्जत जि.अहमदनगर येथील श्री संत सदगुरु गोदड महाराज हे एक भगवान श्री पांडुरंगाचे निस्सीम भक्त वडील भिकाजीराजे आणि आई चंद्रभागा भोसले यांचे चिरंजीव असलेले अमरसिंह भिकाजीराजे भोसले हे महाराजांचं खरं नाव...!
वयाच्या अवघ्या ७ ते 8 व्या वर्षी आपले सर्व राज पाठ राजवाडा आई वडील सोडून विठ्ठल नामात तल्लीन होऊन घराबाहेर पडले...
त्यानंतर वनात फिरत फिरत असताना उदरनिर्वाह करण्यासाठी वनातील फळे खाऊन भूक भागवत असत...
वडफळ उंबर फळ । खाऊनि गोपाळ आठविला ।।
खाली पडलेलीच घ्यावी । झाडावरील न तोडावी ।।
पिऊनी चंद्रभागेचे पाणी । गोदड नारायण चरणी ।।
सातपुडा पर्वतरांगांमध्ये फिरत तिथेच तप साधनेसाठी बसले ५ वर्ष तप केल्यानंतर उपाशी असलेल्या गोदडनाथांना श्री विठ्ठल आणि माता रुख्मिनी वाण्याच्या वेशात येऊन महाराजांना जेवू घालतात ..
माझा पंढरीचा हरी । वनामध्ये पोळ्या चारी ।।
मेवा मिठाई बहुत । किती खाशील अमृत ।।
खाता खाता थकूनि गेला । पोट भरुनी आनंद झाला ।।
गोदड म्हणे ऐसी माया । विठ्ठल पंढरी देखीली आहे ।।
महाराज जेवल्यानंतर अचानक दोघेही अदृश्य होतात..! महाराजांच्या लक्षात ही बाब येते मग
विठ्ठलाला बोल लावतात " मी आजपर्यंत चोरटे तप केले म्हणूनच तू मला चोरटे दर्शन दिले "अस्स म्हणत पुन्हा ५ वर्ष अन्नपानाविण्या कडक तप साधना केली मग मात्र पुन्हा श्री विठ्ठल आपल्या प्रत्यक्ष रुपात येऊन महाराजांना पंढरपूरला येण्याचं आज्ञा देतात...
तिथून जात असताना सातपुडा पर्वतरांगेत असणाऱ्या कासारबारी पठारावर वज्रेश्वरी देवी मंदिर लागते तिथे महाराज देवीच्या दर्शनासाठी गेले देवीने प्रसन्न होऊन महाराजांना आपल्या गळ्यातील माळ प्रसाद म्हणून दिली...
पुढे मंदिर प्रदक्षिणा करत असताना त्यांची आणि तिथे असलेल्या नारायण गोसावी यांची दृष्टिभेट झाली पुढे नारायण गोसाव्यास महाराजांनी अनुग्रह दिला व त्याठिकाणी आपल्या पादुकांची स्थापना केली...आणि त्यास सांगितले तुला ज्या वेळी माझी आठवण होईल त्या त्या वेळी मी तुला दर्शन देईल...पुढे महाराज देहू आळंदी करत बारामतीस पोहोचले तिथे तेथील पाटलाने महाराजांचा अपमान केला तेव्हा महाराजांनी त्या पाटलास शाप दिला पुन्हा बारामतीस मी येणार नाही...
पुढे महाराज फलटण येथील नदीच्या किनारी असलेल्या शिवमंदिरात भजन करत होते.. ही बाब फलटण मधील भाविकांच्या नजरेस पडली पुढे रोज त्यांच्या दर्शनासाठी भाविक येऊ लागले.. ही गोष्ट फलटण येथील संस्थान च्या राणी सगुणामाता ( नरसाबाई निंबाळकर )यांच्या कानावर पडली आजपर्यंत मोक्ष गुरू ची प्राप्ती न झाल्याने त्या महाराजांच्या भेटीसाठी आणि दर्शनासाठी आल्या व अनुग्रहाची याचना केली महाराजांनी त्याना अनुग्रह दिला पुढे त्यांनी महाराजांना राजवाड्यात नेले व महाराजांची सेवा करू लागल्या पुढे फलटण ते पंढरपूर त्यांनी महिना वारी सुरू केली
असेच काही वर्षे गेली असताना ११ व्या वर्षी महाराज कार्तिकी एकादशी साठी पंढरपूर ला गेले असता चंद्रभागा स्नान करून वळवंटाध्ये विठ्ठल नामात तल्लीन असतांना एक स्त्री चंद्रभागेतून पाणी घेऊन आपल्या घरी जात असताना महाराजांच्या राहुटीच्या दोरीला अडकून पडते ...तिचा हंडा सांडतो ती सुद्धा पडते पडल्यानंतर महाराजांना ती अभद्र बोलू लागते " कोणी ही ढोंगी साधू इथं पंढरपूरात येतात..." अस बोलते महाराजांच्या कानावर हे ऐकू जाते महाराज चिडतात आणि चिडून आपलं सर्व दिंडी सामग्री टाळ पखवाज राहूटी एकत्र करतात आणि ते सर्व पेटवून देतात ...
अन चिडून विठ्ठलाला म्हणतात " तुला माझा आता कंटाळा आला आहे, हे जे ही स्त्री बोलली ते ती नव्हे तर तूच तिच्या तोंडून बोलला आहेस त्यामुळे आता आमचा या जगात राहून उपयोग नाही मी आता च्या आता आत्मदहन करणार." म्हनून त्या पेटवलेल्या चितेला प्रदक्षिणा घालू लागतात वाळवंटात हा प्रकार पाहून सर्व लोक जमू लागतात ती स्त्री पण घाबरते ..
मग भगवान श्री पांडुरंग ब्राम्हणाच्या वेशात येतात अन महाराज चितेत उडी घेणार तोच त्यांचा हात धरतात ..
अन म्हणतात "थांबा तुम्ही संत आहात आणि संतांनी आत्महत्या करणे हे महापाप आहे , भगवान पांडुरंग मूळ रुपात येऊन सांगतात तुमचं कार्य अजून संपलेलं नाहीय तुमि तुमच्या जन्मगावी कर्णग्रामी (कर्जत) ला जावे आणि तिथे समाधी घ्यावी ते पुढे चालून महाक्षेत्र होईल...महाराज म्हणतात ठिकय पण इथून पुढे मी या पंढरपूरात पाऊल ठेवणार नाही पण तुला स्वतः ला मला भेटायला कर्जतला यावं लागेल...!
गोदड फकीर उदास | अखंड डोंगरी राहात ||
डोंगरी हिंडे आनंदाने | विठ्ठल बोलतो गर्जून ||
विठ्ठल म्हणता जीव जावा | हेचि मागणे केशवा ||
गोदड म्हणे विठोबासी | अंतकाळी भेट दे आम्हांसी ||
भगवान पांडुरंग महाराजांना वचन देतात मी आषाढी नंतर च्या असणाऱ्या आषाढ वद्य कामीका एकादशी ला प्रतिवर्षी तुला भेटायला कर्णग्रामी येईल...तिथून पुढे महाराज कधीही पंढरपूरला गेले नाहीत महाराजांची ती महिना वारी त्यांनी त्यांचे कोळे ता. कराड येथील शिष्य श्री कृष्णनाथ घाडगे महाराजांना करायला सांगतात ती वारी नित्यनेमाने चालू होते अन ती पूर्ण केली म्हणून दरवर्षी महाशिवरात्री ला ते स्वतः महाराजांना सांगायला येतात ते आजतागायत चालूच आहे...
दिल्या वचनाप्रमाणे भगवान श्री पांडुरंग पंढरपूर वरून आपले वाहन गरुडावर बसून येतात महाराज आणि पांडुरंगाची गळाभेट होते मग महाराज पांडुरंगाला रथात बसवून स्वतः दिंडी मध्ये विठ्ठल नामात तल्लीन होतात ...
हीच ती धाकट्या पंढरीची (कर्जतची) यात्रा....!
या कर्जतं नगरातं ....
काय ss वाजतं गाजतं..
काय ss वाजतं गाजतं...
टाळ मृदंगाच्या गजरात
स्वागत पांडुरंग रायाचं..
या कर्जतं नगरातं..ss
काय ss वाजतं गाजतं..
काय ss वाजतं गाजतं...
. ते म्हणतात ना...
"भक्ताने भावबळे रुक्मिणिवर कळवळोनि आळविला
अहिवरालस्य पटूप्रभू करुणाकर द्वारकेत गहिवरला"
म्हणून च दरवर्षी आषाढी नंतर येणाऱ्या आषाढ वद्य एकादशी ला कर्जत जिअ.नगर मध्ये मोठा रथोत्सव साजरा होतो भगवान श्रीपांडुरंगाची भव्य तीन मजली रथात बसवून दिंडी नगर प्रदक्षिणा काढली जाते त्यामध्ये सर्वात वरच्या तिसऱ्या मजल्यावर पवनपुत्र श्री हनुमान विराजमान असतात ...
दुसऱ्या मजल्यावर श्री गरुड विराजमान असतात ...
आणि पहिल्या मजल्यावर भगवान श्री पांडुरंग सिंहासनावर विराजमान असतात...आणि स्वतः महाराज दिंडीमध्ये विठू माऊलींच्या नामघोषात तल्लीन असतात...
असा हा कर्जतचा
धाकट्या पंढरीचा रथोत्सव दरवर्षी याची देही याची डोळा मोठया आनंदाने साजरा केला जातो ..
म्हणूनच कर्जतकर म्हणतात ..!
धन्य धन्य श्री संत सदगुरू गोदड नाथा..
कर्जत ग्रामी आणीयले श्री पंढरीच्या नाथा...!
🙏🙏🙏🙏🙏🙏
🖋
सदगुरू चरणी तत्पर 🚩
सेवेसी निरंतर..👏
चि. गणेश पंढरीनाथ काकडे

Comments
Post a Comment