या दुनियेत प्रेमाला नाही तर पैशाला किंमत आहे
या दुनियेत प्रेमाला नाही तर पैशाला किंमत आहे
"आईवडिलांना आपल्या प्रेमाबद्दल सांगण्याची तिची हिंमत होत नव्हती......."
त्यात दोघांची जात देखील वेगळी, शेवटी त्या संध्याकाळी त्याने अन तिने दोघांनी ही हिंमत करुन घरी सगळं सांगितलच.....
हे " ऐकताच " तिच्या आईने जोरजोराने डोक्यावर हात मारून घ्यायला सुरूवात केली. वडिल शांत बसले होते. त्यांनी मुलगा काय करतो याची विचारपूस केली. तो अजून तितका सेटल नव्हता आणि स्वतःच घरदेखील नव्हतं. लग्नानंतर तिला गावाकडील घरी राहावं लागलं असतं. आयुष्यभर ति शहरात वाढलेली , तिला गावाकडे वगैरे राहणं जमलं नसतं. त्यामुळे वडिलांनी नकार दिला.....
ति रूसून बसलेली पाहुन, आईने स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करुन घेईल अशी तिला धमकीच देऊन टाकली....आता मात्र ति अजुनच घाबरली....आईचं आकांडतांडव बघून तिचं डोकं बधीर झालं होतं....
अनेक दिवस जाऊनही घरच्यांचा निर्णय बदलत नव्हता. दिवसेंदिवस घरातील वातावरण अजुनच गढुळ होत चाललेलं. शेवटी तिने त्याला फोन केला आणि
" नातं "तोडण्याचा निर्णय घेतला....
" ५ वर्षाचं नातं " अशाप्रकारे तुटल्यामुळे तोही ढासळला. हळूहळू तिने त्याचे फोन घेणं कमी केलं. उचलला तरी तोड़कंमोड़कं बोलू लागली.मेसेजेसल सुरुवातीला रिप्लाय देणं बंद केलं. नंतर ब्लॉकच करुन टाकलं.
सगळ्यांचा विचार करत तो थांबला पन शेवटी त्याच्या वाट्याला काय आलं आलं ते फक्त अन फक्त एकटेपणा अन "आरोपच......"
गेली ५ वर्षे तो भावनेच्या भरात सगळं आयुष्य तिच्यासोबत काढण्याची स्वप्ने रंगवत होता आणि एकाएकी पायाखालची जमीनच सरकली.
काही दिवसांनी त्याने तिच्या भावाला त्यांचं नाव न घेता सगळं सांगितलं... त्याला त्याचा भूतकाळ अन वर्तमान काळ दोन्ही माहिती होता.... प्रेम करणारा मुलगा पैसे पाणी याच कधीच लोड घेत नव्हता पण तो खचलेला तेव्हा जेव्हा त्याने ज्याच्यावर जास्त विश्वास टाकला जिच्यावर जीव लावला त्या व्यक्तीला त्याच्या साठी न आता वेळ आहे न त्याच आता काही देणंघेणं आहे ..दुनिया बदलते पण इतकी बदलेल हे अनुभवत होता तो.....
"आयुष्यभरासाठी ज्यांची साथ समोर ठेवली होती.... ती व्यक्ती जेव्हा लाथ मारून जाते तेव्हा तो खचला..कारण , इथे विश्वासाला तडा गेलेलाे होता....
"बाकी कोण कोणासाठी थांबत नसतं.."
हे पण तिच्या भावाने अन त्याच्या मित्रानेच त्याला सांगितलं ....जी व्यक्ती तिच्या ही जवळची आहे कारण त्या मित्राच्या मते जीवनात फक्त " पैसा " imp आहे बाकी मन भावना पैशापुढे शून्य आहेत.. पण प्रेम करणाऱ्या अन त्याच्या मित्राच्या विचारात फरक आहे....
" मित्र डोक्याने विचार करतो अन ,
प्रेम करणारा मनाने..."
" पैसा आज आहे उद्या नाहीय पण माणूस....!आज आहेच ते उद्या भेटणार आहे का ..? "
या मताचा तो....!
पण याचा विचार आपला मित्र करत नाही याने तो खचला होता....
आयुष्यात असे " वादळ " येत आहेत सारखे त्याने त्याला काही नाही दिलं ...
तरीही " कोण कसा कधी वागेल हे सांगता येत नाही ...मग तो जवळचा " मित्र " असो
" बायको " असो " प्रेयसी " असो किंवा अजून " कोण " असो हा मात्र अनुभव त्याला येत होता ....
"प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते ... त्या व्यक्तीने तुझ्याबद्दल तसा विचार केला आहे. त्यामुळे तु पण तसाच वाग अस मला वाटत.....! "
असेही सल्ले त्याचे बाकी मित्र, नातेवाईक त्याला देत होते....
आता त्याचं life कोणत्या वळणावर त्याला नेऊन ठेवल..हे त्यालाही माहिती नव्हतं.. ....पण " त्याला कामपूरतं कोणाला जवळ करायला त्याला कधीच जमलं नाही....!
अन यापुढे जमणार सुद्धा नाहीयं त्यामुळं जस लोक वागतील तसं तर त्याला उभ्या आयुष्यात जमलचं अस्स पण नाहीय ...!
मग , सरतेशेवटी या जगाची रीत त्याच्या लक्षात आली की तुमची
" जात आणि पैसा "सर्वकाही ठरवते....
बाकी तुम्ही " माणूस " म्हणून कितीही चांगले असला तरी या दुनियेला देणंघेणं नाही....
" दुसर्यांना धीर देणारा तोही आतून कधी - कधी खचला होता.."
त्याला पण मन होतं...
पण आता त्याच मात्र ऐकणारं...!
त्याच हक्काचं त्याच्याजवळ कोण नव्हतं....!
आता , तो जगतो आहे त्याच्याच धुंदीत अन त्याच्या च एक स्वतः च वेगळं जग निर्माण करण्याच्या नादात......!
लढतो...!
झगडतो...!
अन पडतो ही आहे....!
अन ...
" पुन्हा नव्याने संकटांना तोंड देत उभं ही राहातो आहे..."
"जब जब वो बिखरा है दुगनि रफ्तार से निखरा है....!"
Comments
Post a Comment