महाराष्ट्रात उभा राहणारा फॉक्सकॉन वेदांता चा सेमिकंडक्टर बनविण्याचा प्रकल्प गुजरातला उभा राहणार
महाराष्ट्रात उभा राहणारा फॉक्सकॉन - वेदांता चा सेमिकंडक्टर बनविण्याचा प्रकल्प गुजरातला उभा राहणार..!
Foxconn-Vedanta's semiconductor manufacturing project standing in Maharashtra will stand in Gujarat..!
फॉक्सकॉन - वेदांता नुकतंच हे प्रकरण महाराष्ट्रासह देशात गाजत आहे तब्बल १ लाख ५८ हजार कोटींचा हा प्रकल्प महाराष्ट्रात पुण्याजवळ तळेगाव येथे उभा राहणार होता प्रचंड मोठ्या प्रमाणात यातून युवकांना रोजगारनिर्मिती होणार होती पण हा मंजूर प्रकल्प अचानकपणे गुजरात ला शिफ्ट झाला आहे त्यातील कारणं काय आहेत ते संबंधित सरकार मग ते आताचे असो किंवा मागचे दोन्ही सुद्धा कारणीभूत असतीलही त्यात आपल्याला पडायचं नाही पण एवढा मोठा अन महाराष्ट्रातील रोजगार निर्मिती चा प्रश्न सोडवणारा हा प्रकल्प गुजरातला गेला त्यामुळं आपला महाराष्ट्र मात्र यामुळे पुन्हा विकासाच्या अन रोजगाराच्या बाबतीत त्याच कासवगतीवर आला आहे हे मात्र नक्की आहे...!
फॉक्सकॉन ही करार उत्पादक कंपनी एप्पल या मोबाईल कंपनीसाठी एप्पल फोन बनवून देण्याचं काम करते तर वेदांता ही कम्पनी तेल आणि खान या क्षेत्रात काम करते
या दोन्ही कंपनी मिळून जेवी (JV) मध्ये Semiconductor बनविण्याचं काम करणार आहेत त्यासाठी त्यांनी भारतात महाराष्ट्रात हा प्रकल्प उभा करण्यासाठी तयारी दाखविली होती.
सेमिकंडक्टर म्हणजे काय...?
आपल्या कार , मोबाईल ,लॅपटॉप,टीव्ही मध्ये जर सेमिकंडक्टर नसेल तर ते व्यवस्थित चालणार नाहीत डिस्प्ले पावर पुरविणे तसेच डेटा ट्रान्सफर करणे यासारखी कामे हे उपकरण करते थोडक्यात सर्व इलेक्ट्रॉनिक आणि ऑटोमोबाईल उपकरणातील मेंदू त्याला म्हणावं लागेल सेमिकंडक्टर शिवाय कार,मोबाईल, लॅपटॉप,टीव्ही गेम कॅनसोलिंग,घरगुती उपकरणे हे चालू शकत नाही सर्व ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात याची मागणी खूप प्रमाणात आहे पण संपूर्ण जगभरात २०२० पासून कोरोना काळा पासून या सेमिकंडक्टर चिप च तुटवडा निर्माण झाला आहे जगात चीन हा सर्वात मोठा सेमिकंडक्टर निर्यात करणारा देश आहे पण या महत्त्वाच्या उपकरणाच्या निर्मितीसाठी फॉक्सकॉन - वेदांता या दोन्हीही कंपन्या भारतात तेही महाराष्ट्रात हा प्रकल्प उभा करणार होती या प्रकल्पासाठी भरपूर प्रमाणात जागा ,चांगले रस्ते, वीज, त्या त्या भागातील सरकार ची गुंतवणूक आणि सहकार्य तसेच आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण असाव्या लागतात तरच अशा कंपन्या एवढी मोठी गुंतवणूक करायला तयार असतात ही कंपनी महाराष्ट्रात उभी राहिली असती तर संपूर्ण जगाला चीनच्या नंतर सेमिकंडक्टर चिप पुरविणार महाराष्ट्र हे राज्य ठरलं असतं तसेच यासाठी जगभरतुन मागणी असल्यामुळे संबंध महाराष्ट्राला याचा आर्थिक दृष्टया सुद्धा फायदा झाला असता तसेच भरपूर युवकांना यातून रोजगार मिळाला असता...!
राजकारणाच्या पलीकडे जाऊन या विषयावर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व राजकीय नेत्यांनी एकत्रितपणे येऊन काम केले पाहिजे हे संबंध महाराष्ट्राला हवे आहे तर तसे न होता स्वार्थापोटी असा महत्वपूर्ण प्रकल्पाला स्थिगिती देऊन नाईलाजाने ते प्रकल्प जर दुसऱ्या राज्यात जात असतील तर ही गोष्ट महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे नक्कीच याचा विचार राजकारण्यांनी करणे गरजेचा आहे...हा प्रकल्प गुजरातला का गेला याचा खुलासा चौकशी मध्ये होईलच मग समजेलच यांमध्ये कोण दोषी आहे पण तूर्तास या राजकीय चढा ओढीमध्ये महाराष्ट्र मात्र मागे पडत चालला आहे हे मात्र नक्कीच अधोरेखित करणारी बाब आहे...
Comments
Post a Comment