दिल्लीमधील राजपथाचे नाव आजपासून कर्तव्यपथ



दिल्लीमधील राजपथाचे नाव आजपासून " कर्तव्यपथ..





नवी दिल्ली - नवी दिल्ली येथील राजपथ असलेला संपूर्ण परिसर हा  "कर्तव्यपथ"  म्हणून ओळखला जाणार असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्रसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचं अनवारण करत या राजपथाला कर्तव्यपथ हे नाव घोषित केले आहे...एनडीएमसी च्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे...नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून असणारा राष्ट्रपती भवनापर्यंत चा संपूर्ण परिसर आता कर्तव्यपथ म्हणून ओळखला जाणारा आहे...



 छायाचित्र - फेसबुक साभार


यातून भारतीयांना कर्तव्याप्रति आपल्या राष्ट्राप्रति असलेल्या कर्तव्याची जाणीव होण्याचं काम नक्की होणार आहे आपला भारत देश नक्कीच बदलत चालला आहे आणि हा बदल घडत आहे कारण या देशाच सूत्र अशा माणसाच्या हातात आहे जो देशासाठी च जगतोय अन देशासाठी च मरायचा ज्याने आपल्या जीवनाचा उद्देश ठेवला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भारताला लाभलेले आहेत...


छायाचित्र - फेसबुक साभार


आपला भारत देश एका नव्या वाटेने साकार होत आहे बदलत आहे आयोध्येमध्ये भव्यदिव्य प्रभू श्रीराम मंदिर उभं राहतं आहे,काल परवा च भारतीय नौदलाच्या ध्वजा चं चिन्ह म्हणून अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत आणि भारतीय आरमाराचे जनक म्हणून अवघ्या जगात माहीत असलेलं हिंदुसम्राट छत्रपती श्री शिवरायांची राजमुद्रा असलेल चिन्ह या युद्ध नौकांच्या सैनिकांना प्रेरणा देणारी गोष्ट झाली, आज स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा लावून त्या परिसराला अखंड भारतीयांना प्रेरणा देणारं कर्तव्यपथ नामकरण केल आहे..अशा एक न अनेक गोष्टीचा निर्णय देशाचा विकासात्मक आणि एकतिहासिक सांस्कृतिक वारसा जपत विचारपूर्वक करून घेतल्या जात आहेत ही संबंध भरतीयांसाठी आनंदाची गौरवाची बाब आहे...

छायाचित्र- फेसबुक साभार


भारत एका सांस्कृतिक एकतेच्या बदलाच्या दिशेने जात आहे ज्यात शत्रूला कुठलेही स्थान नसणार आहे आणि एक  दिवस असा नक्की येईल ज्या स्वतंत्र अखंड भारतासाठी या भारतमातेच्या सुपुत्रांनी आपले जीवन खर्च केले त्यांना आपले तन मन धनाने या स्वातंत्र्य लढ्यात आपले प्राणही घालवले त्यांचे स्वप्न येत्या काळात नक्कीच साकार होतील.. आणि संबंध हिंदूस्थान ताठ मानेने भारतमातेचा अखंड हिंदुराष्ट्राचा पवित्र भगवा ध्वज हा अभिमानाने डौलाने फडकविला जाईल...ही खात्री आहे...

दिला शब्द पाळू जरी प्राण गेला ।
असे पुत्र व्हावे आता मायभूला ॥
जगू आईसाठी असा ध्यास ज्यांना ।
उठा हाक मारू अशा बांधवांना ॥

गुळासारखी गोड वाणी मुखात ।
अती आदरे लोक ही मानतात ॥
अशांच्या हाती नित्य भगवा असावा ।
जगीं हिंदु अष्टावधानी असावा ॥








Comments

Popular posts from this blog

मोबाईलवरून पैसे कसे कमवायचे? | Online Earning Marathi Guide

घरबसल्या पैसे कमवण्याचे 10 खात्रीशीर मार्ग (2026 अपडेट)

सरकारी योजना 2026: सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या 10 महत्वाच्या योजना । मराठी माहिती