सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनावरून चाललेलं गोंधळ नक्की विचार करायला लावणारा आहे




सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनावरून चाललेलं गोंधळ नक्की विचार करायला लावणारा आहे



               image_titel



पैसा च सगळं काही नाहीय हे खरं आहे.. पण पैशाशिवाय सुद्धा काही चालत नाहीय हे पण तितकच १००१ % खरं आहे..त्यामुळं नीतीने तत्वाने अन कष्टानचं योग्य मार्गानेच पैसा पण कमविणे गरजेचं आहे..आणि तो सन्मार्गी लावणे पण तितकाच गरजेचं आहे..

नुकतच घडलेलं प्रकरण म्हणजे टाटा सन्स चे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचा कार अपघात झाला त्यात ते मरण पावले..त्यावर विविध माध्यमांवर विविधी प्रकारे चर्चा चालू च आहे त्यात सोशल मीडिया वर देखील त्यांच्या संपत्ती मुळे त्यांच्यावर टीका होत आहे...टीका करणारे दीड शहाणे तब्बल ७० कोटी एवढी मोठी संपत्ती असणारा माणूस शेवटी मरताना काय नेलं..? कसा मेला...? अस अस्स झालं न तस्स झालं...अशा प्रकारच्या टीका करत आहेत पण या साऱ्या बाष्कळ गप्पा आहेत हे समजून घ्या...

आपल्याकडे जर पैसा च नसेल जवळ तर साधं काळ कुत्र पण विचारत नाही आजच्या काळात योग्य प्रकारे कष्टाने मिळविलेला पैसा संपत्ती ही कधीही कमी होत नसते अन ती कमविली च पाहिजेत तर आणि तरच आपला निभाव लागू शकेल आज काल जगताना कशाला नाही म्हणून पैसे लागतात सगळीकडे पैशा शिवाय काहीच चालत नाहीय काही घ्यायचं म्हणलं तर पैसे लागतात ,दवाखान्याला पैसा लागतो ,पैसे असेल तरच समाज किंमत देतो,सगळी सुख ऐशो आराम पाहिजे असतील तर पैसा पाहिजेच,कुटुंब चालविण्यासाठी पैसा हा जीवनातील गरजेचा आणि अविभाज्य घटक आहे,एवढंच काय तर आजकाल  पोरांचे लग्न करायला पोरी देताना सुद्धा त्याच्याकडं पैसा किती आहे  हेच कटाक्षाने पाहिलं जातंय..

ते उद्योजक सायरस मिस्त्री होते करोडो अरबो ची संपत्ती आयुष्यभरात कमविली त्यांनी तब्बल ७० कोटी तरी असतीलच...आपल्या पुढच्या १० पिढीची सोय करून ठेवली त्यानि ते जगले पण राजासारखच....पण मरण आलं ते पण ३ ४ कोटींच्याच गाडीमध्ये... ते कुठं अन कसे निधन पावले हा भाग वेगळा पण जे जे दीड शहाणे लोक त्यांच्यावर टीका करत आहेत त्यांनी आपल्या स्वतःकडे यातलं २ ४ % मेहनतीने तरी कमावलेलं आहे का...? तर उत्तर नाही च मिळेल...आपल्या घरात अशी काही अपघाती घटना झाली तर त्यातून सावरण्यासाठी लागणारा खर्च भागविता भागविता नाकी नउ येते सामान्य माणसाची... तस श्रीमंत माणसाला याची झळ कमी प्रमाणात बसते पण गरिबाला मात्र अशा घटनांमधून सावरण्यासाठी अख्ख आयुष्य त्यात खर्ची कराव लागतं...

त्यामुळं टीका करण्यापेक्षा आपल्याही आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्यांच्या जीवन संघर्षाकडे बघून आपल्या आर्थिक सक्षम आयुष्याची वाटचाल करण्यासाठी प्रेरणा घ्यावी.... ना की त्यांच्यावर टीका करावी...मरण हे कोणाच्या हातात नाही हे जरी सत्य असलं तरी माणसाला सर्वगुणसंपन्न आयुष्य जगायचं असेल तर योग्य मार्गाने कष्टाने मेहनतीने पैसा कमविलाच पाहिजेत मग तो पैसा जेवढा जास्त कमविता येईल तेवढ त्याच्यासाठी त्याच्या कुटुंबासाठी चांगलच आहे.


जगण्याच्या या लढाईत आपण स्वतःच सुद्धा सबळ मग ते सामाजिक असो वा आर्थिक ते असावंच अन नसेल तर ते नव्याने निर्माण करण्यासाठीच झटलं पाहिजेत तर आणि तरच आपल्याला अन आपल्या जगण्याला आजच्या जगात किंमत आहे....









Comments

Popular posts from this blog

मोबाईलवरून पैसे कसे कमवायचे? | Online Earning Marathi Guide

घरबसल्या पैसे कमवण्याचे 10 खात्रीशीर मार्ग (2026 अपडेट)

सरकारी योजना 2026: सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या 10 महत्वाच्या योजना । मराठी माहिती