गडकोट किल्ल्यांवर श्री गणेशाची मूर्ती किंवा गणेशपट्टी हमखास पाहायला मिळते ती कशामुळे




गडकोट किल्ल्यांवर श्री गणेशाची मूर्ती किंवा गणेशपट्टी हमखास पाहायला मिळते ती कशामुळे..?







गणेशोत्सव आला की महाराष्ट्रात धामधूम सुरू होते ते श्री गणरायाच्या स्वागताची जो तो आपल्या आपल्या परीने गणरायाच्या स्वागताची तयारी आपल्या सार्वजनिक गणेश मंडळात करताच पण आपल्या घरात सुद्धा दिमाखात अन आकर्षक पद्धतीने करतो कारण लहानांपासून थोरा मोठ्याना सुद्धा या उत्सवाचे वेड असते कारण बाप्पा म्हणजे सर्वांसाठी आवडीचा विषय आहे...



असाच विषय पाहायला गेलो तर महाराष्ट्रातील बऱ्याच किल्ल्यावर तुम्हाला श्री गणेशाची मूर्ती किंवा गणेशपट्टी पहायला मिळेल त्यात श्री शिवरायांच्या आधीपासूनच चे किल्ले असोत किंवा श्री शिवछत्रपतींनी उभारलेले हिंदवी स्वराज्याचे किल्ले असोत त्यावर श्री गणेशाची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल तर काही किल्ल्यांवर गणेश मंदिरे सुद्धा बघायला मिळतील..महाराष्ट्रात वेगवेगळे असंख्य गडकोट किल्ले आहेत या किल्ल्याना अगदी आठ शतकांपासूनचा ते अठराव्या शतकापर्यँत चा इतिहास आहे त्यात सातवाहन,कलचुरी,राष्ट्रकूट, चालुक्य,अभिर,यादव,शिलाहार,मराठे असे कित्येक राजवंश या राजवंशाणी आप आपल्या इष्ट देवतेची मंदिरे किंवा प्रतिमा या आपल्या किल्ल्यांवर बांधली तसेच कोरली अनेक किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर, धान्य कोठरावर,राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर तुम्हाला गणेशपट्टी कोरलेली दिसेल..श्री गणेशाला प्रत्येक कार्यात विघ्न आणणारा म्हणून पाहिले जायचे पण नंतर तोच गणपती देवी देवतांच्या आशीर्वादाने अन वरदानाने पुढे चालून विघ्नहर्ता झाला घरातील प्रत्येक शुभ प्रसंगी आधी गणपतीला स्थान असते. गडकिल्यांच्या प्रवेशद्वाराला, धान्यकोठराला, श्री गणेशाची मूर्ती किंवा गणेशपट्टी बसविण्याचे कारण म्हणजे आधी वंदू तुझ मोरया याच उद्देशाने.



श्री गणेशाच्या अंगावर असणाऱ्या शेंदूर रंगामुळे भूत पिशाच्च अशा गोष्टी चौकटीच्या आत येऊ नये हा सुद्धा एक उद्देश होता. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला श्री गणेशपट्टी किंवा श्री गणेशाची मूर्ती बघायला मिळेल...छत्रपती श्री शिवरायांनी सुद्धा किल्ले रायगड वर जगदीश्वराच्या मंदिराच्या प्रवेश द्वारावर , कुलाबा किल्ल्यावर,चावंड ,रतनगड या किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर गणेश मूर्ती बसविल्या आहेत.


याशिवाय काही गडकिल्ल्यांवर तुम्हाला तांत्रिक गणेश मूर्ती सुद्धा पाहायला मिळतील...त्यातील जास्तीत जास्त तांत्रिक गणेश मूर्ती तुम्हाला हरिश्चंद्रगडावर तसेच मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या कणकवली येथील रामगड किल्ल्यावर ही तांत्रिक गणेशमूर्ती बघायला मिळतील..


माणिकगड ,विशाळगड,पन्हाळगड ,दातेगड,बागलानात असलेला मुल्हेर किल्ला,अर्नाळा गड ,पावनगड,कलानिधीगड,रांगणा गड,राजगड तसेच कुरटी बेटाची जलदुर्ग उभारणी करताना केलेल्या पुज़ विधी मध्ये सुद्धा शिवलिंग ,नंदी,सूर्य चंद्र,गणपतीच्या मूर्ती कोरलेल्या आहेत त्यास मोरायाचा धोंडा असेही म्हणत आजही पुजले जाते...

गडगणपती म्हनून हा देव आजही आपली शेकडो वर्षांची परंपरा अभिमानाने हे चंद्र सूर्य असेंपर्यत दिमाखाने जपत आहेत.


Comments

Popular posts from this blog

मोबाईलवरून पैसे कसे कमवायचे? | Online Earning Marathi Guide

घरबसल्या पैसे कमवण्याचे 10 खात्रीशीर मार्ग (2026 अपडेट)

सरकारी योजना 2026: सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या 10 महत्वाच्या योजना । मराठी माहिती