पंढरीची वारी आणि श्री संत सदगुरु गोदड महाराज
पंढरीची वारी आणि श्री संत सदगुरु गोदड महाराज
पंढरीची वारी आणि श्री संत सद्गुरू गोदड महाराज...!
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।।
पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।
२८ युगे उभा असणे म्हणजे काय
१. सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि अशा चार युगांचे एक चक्र, म्हणजेच एक फेरा होतो. सध्या पृथ्वीतत्त्वाचा सातवा फेरा चालू आहे. ७ x ४ = २८. सध्या २८ वे युग चालू आहे. विठ्ठल २८ युगांपासून उभाच आहे.
२. ४ वेद, १८ पुराणे आणि ६ शास्त्रे यांची बेरीज २८ असणे आणि त्यांनी पांडुरंगाचे गुणगान करणे : ४ वेद, १८ पुराणे आणि ६ शास्त्रे यांची बेरीज २८ होते; म्हणून विठ्ठल ‘युगे अठ्ठावीस’ उभा आहे; कारण हे सर्व (वेद, पुराणे आणि शास्त्रे) त्याचेच गुणगान करणारी आहेत.’
‘विठ्ठल २८ युगांपासून उभा आहे, असे म्हटले आहे. ‘उभा आहे’, याचा अर्थ विठ्ठल २८ युगांपासून निर्गुण स्वरूपात, म्हणजेच तत्त्वरूपाने कार्यरत आहे. यावरून विठ्ठलाचे अनादित्व लक्षात येते.’
सध्या महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे आणि त्याचे कारण म्हणजे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यासाठी मोठा आनंदाचा दिवस असतो.सर्व वारकरी विठू रायच्या दर्शनासाठी अतुरलेले असतात. म्हणून या एकदशी साठी गेले अनेक वर्षे झाली अवघ्या महाराष्ट्रातून सर्व संत मंडळी विठुरायाच्या दर्शनाला जात आहेत तसेच वारकरी ही त्या दिंडी मध्ये सामील होऊन संतांच्या सानिध्यात विठुरायाच्या दर्शनाला अखंडपणे जात आहेत. महाराष्ट्रातील सर्व संत मंडळी श्री संत निवृत्तीनाथ महाराज,श्री संत ज्ञानेश्वर महाराज,श्री संत तुकाराम महाराज,श्री संत नामदेव महाराज,श्री संत एकनाथ महाराज,श्री संत सोपानकाका महाराज, संत मुक्ताबाई,संत जनाबाई यासारखे असंख्य संतांच्या पालख्या ह्या आषाढी एकादशी साठी पंढपुरात दाखल होतात.
आषाढी कार्तिकी भक्तजन येती हो साधुजन येती । चंद्रभागेमाजी स्नान जे करिती ।।
दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती । केशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे ओवाळीती ।।
असच श्री संत गोदड महाराज सुद्धा पंढरीची वारी करत होते. ते पण मासिक वारी दर महिन्याला ते पंढरीत विठुरायाच्या दर्शनासाठी येत असत. महाराजांनी वज्रेश्वरी येथे १२ वर्ष तप साधना केल्यानंतर फलटण येथे जाणोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या येथे राहत असत.त्यांच्या आई नरसाबाई (सगुणाबाई) या महाराजांच्या निस्सीम भक्त होत्या आणि तेथूनच ते पंढरपूरला दर महिन्याला जात होते.पंढरपूरला जाऊन तिथे चंद्रभागेत स्नान करून आपले सर्व दिंडीतील वारकरी घेऊन महाराज पंढरपुरात नगरप्रदक्षिणा करत असत जस आज ही आपल्या कर्जत जि. अ. नगर गावामध्ये दर पंधरा दिवसांनी आपल्या मंदिरातून दिंडी निघते आणि पूर्ण नगरप्रदक्षिणा घालते महाराजांचा तोच वारसा आजही अखंडपणे ऊन वारा पाऊस कशाचाही विचार न करता आजही चालू आहे आणि चालू राहील.
ठाकलोसे द्वारी । उभा याचक भिकारी ।।१।।
मज भीक घाली देवा । प्रेमे भातुके पाठवा ।।२।।
याचकांचा भार । देऊ नये येरझार ।।३।।
तुका म्हणे दान । सेवा घेतल्यावाचून ।।४।।
प्रदक्षिणा झाल्यानंतर विठुरायाचे दर्शन घेऊन महाराज संध्याकाळी आपल्या चंद्रभागेच्या वळवंटामध्ये असणाऱ्या राहुटीमध्ये येऊन परत हरिनामात दंग होऊन भजन करीत असत..
असच नित्यक्रम चालू होता त्यात कधीही खंड पडत नव्हता. एकेदिवशी मात्र एक विचित्र घटना घडली.....असेच महाराज आपली नगरप्रदक्षिणा करून आपल्या चांदणीमध्ये (राहुटी)विठूनामात दंग होऊन भजन करीत होते..तेवढ्यात एक स्त्री चंद्रभागेतून पाणी घेऊन जात असताना महाराजांच्या राहुटीच्या दोरीला अडकून पडली तीच सगळं पाणी सांडलं ती रागावली आणि महाराजांना बोलू लागली...
"ढोंगी साधू आला कोण । पाणवठ्या केली अडचण । चांदणी मार्गात उभी करून । करी निर्लज्ज भजन "
अशा प्रकारे बोलू लागली महाराजांच्या कानावर तिचे बोल पडले महाराज संतापले ते तिला काही नाही बोलले पण विठ्ठलालाच म्हणले.
विठ्ठला तुला माझा कंटाळा आला आहे असं आता आम्हास वाटू लागले आहे ....हे जे ही स्त्री बोलत आहे ते ती स्वतः नाही बोलत तर तिच्या तोंडून तू बोलत आहेस....आता परत तुझे तोंड पाहणार नाही आम्ही आमचा प्राण देऊ .
असे म्हणत त्यांनी चिडून सर्व दिंडीची टाळ, मृदुंग,झेंडे,राहुटी, गोधडी अशाप्रकारची सर्व सामग्री एका जागेवर गोळा केली आणि ती पेटवून त्यात उडी घ्यायची हे मनोमन ठरविले आणि त्या चितेला प्रदक्षिणा घालायला सुरवात केली सगळं वाळवंट लोकांनी भरलं आणि चर्चा सुरू झाली काहीतरी अघटित घडणार विठ्ठलाने ते पाहिलं आणि लगेच एका साधू मनुष्याचा वेष धारण करून आले आणि महाराज त्या अग्नीत उडी घेणार तोच त्यांचा हात धरून त्याना बाजूला घेतलं आणि म्हणले " काय करतोयस तू हे आत्महत्या करणे पाप आहे हे करू नकोस आत्महत्या केलेला जीव नरकात जातो...संतकुळास दूषण लागेल"
आणि हे ऐकुन महाराज थांबले आणि म्हणाले या " विठ्ठलाला आमचा कंटाळा आलाय म्हणून आम्ही हे केले आणि आम्ही जे बोललो ते विठ्ठला शपथ घेऊन प्रतिज्ञा केली आहे..."
हे ऐकून विठ्ठल त्याच्या मूळ रुपात आला आणि आणि म्हणाला " काही हरकत नाहीय...
आता माझे म्हणने ऐक ..."ज्या भूमीवर तुझा जन्म झाला तेच तुझ्यासाठी महाक्षेत्र आहे तेथेच तुझं निर्वाण होईल ते स्थान तुज्यासाठी योग्य आहे असे वेद पुराणात सांगितले आहे तू तुझ्या जन्मस्थळी कर्णग्रामी (कर्जत) येथे जा... समाधीस्थ_हो.... आषाढी एकादशी नंतर येणाऱ्या आषाढ कृष्ण एकादशी ला आम्ही तुला भेटायला येऊ ......असे भगवान श्री पांडुरंगाने श्री गोदड महाराजाना अभिवचन दिले आणि दर्शन देऊन अदृश्य झाले...."
भगवान श्री पांडुरंगाने दिलेले हे वचन आजही चालू आहे स्वतः श्रीहरी भगवान पांडुरंग_गोदडनाथाना भेटायला आजही
कर्जतला येतात त्यादिवशी मोठ्या उत्साहात हा उत्सव रथयात्रा म्हणून साजरा केला जातो....
स्वतः श्री पांडुरंग या रथात विराजमान असतात आणि श्री संत गोदड महाराज हे स्वतः दिंडीमध्ये हरिनामात दंग असतात जेव्हा भगवान श्री पांडुरंग आणि गोदड महाराज यांची भेट होईल तेव्हाच या यात्रे साठी असणारा ३ मजली लाकडी रथ ओढल्या जातो .....
यामुळंच आपल्या कर्जत गावातून पंढरपूरला दिंडी जात नाही कारण स्वतः पांडुरंगच दिलेल्या वचनाप्रमाणे कर्जतला महाराजांना भेटायला येतात.....
कर्जत आमुचे पंढरपुर । गोदड नाथ रमावर ।।१।।
शुद्ध भक्ती गोदावरी गंगा । भाव पुंडलिक होई जागा ।।२।।
याहो याहो अवघे जन । करा गोदड समाधीसी वंदन ।।३।।
कृष्ण म्हणे गोदडनाथा । धाव पाव सद्गुरू आता ।।४।।
क्रमशः
सद्गुरू चरणी तत्पर......
चि.गणेश पंढरीनाथ काकडे
७०५७२७१०१०
Comments
Post a Comment