हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्ताने कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सदगुरु गोदड महाराज मंदिरात जागतिक भविष्यवाणी २०२३ - २४ चे वाचन


                         


     मंदिरावर उभारलेली गुढीपाडव्याची पारंपरिक गुढी

हिंदू धर्म ग्रंथानुसार हिंदू नववर्षाची सुरुवात ही चैत्र शुद्ध प्रतिपदेला होते ब्रम्हदेवाने सृष्टीला चालना दिली आणि तेथूनच सगळं जीवन चैतन्य सुरू झाले चालना दिल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा सूर्योदय झाला तेव्हा दिवसाची सुरुवात होते म्हणून गुढीपाडव्याला सूर्योदयाची गुढी उभारली जाते गुढी हे विजयाचे प्रतीक आहे आनंदाच प्रतीक आहे म्हणून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गुढी उभारली जाते.

संतांनी सुद्धा गुढी चा उल्लेख आपल्या अभंगांमध्ये केलेला आहे..

ज्ञानेश्वरी अध्याय / चौथा 
अधर्माची अवधी तोडी । दोषांची लिहिली फाडी ।
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।। ५० ।।
      - श्री संत ज्ञानेश्वर महाराज

श्री तुकाराम गाथा अभंग क्र. ४५२९
आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढलीया ।। १ ।।
पुढे पाठविले गोविंदें गोपाळा । देऊनी चिपळ्या हाती गुढी ।। २ ।।
हाका आरळीया देऊनी नाचती । एक सदावीती हरी आले ।। ३ ।। 
आरंधी पडली होती तया घरी । संकीर्ण त्या नारी नर लोक ।। ४ ।।
लोक भूक ताण नाही निद्रा डोळा । रूप वेळोवेळां आठविती ।। ५ ।।
आहकटा मग करिती गेलीया । आधी ठावा तया नाही कोणा ।। ६ ।।
आधी चुकी मग घडे आठवण । तुका म्हणे जण परीचया ।।७ ।।
            - जगतगुरु श्री तुकाराम महाराज 

टाळी वाजवावी गुढी उभारावी  ।
वाट ती चालावी पंढरीची ।।
           - संत चोखामेळा

 


         अ. नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचे ग्रामदैवत श्री संत सदगुरू गोदड महाराजांनी लिहून ठेवलेल्या संवत्सरीचे दरवर्षीप्रमाणे हिंदू नववर्ष असणाऱ्या चैत्र शु.प्रतिपदेला गुढी पाडव्याच्या दिवशी मंदिरावर गुढी उभारून मंदिरात संवत्सर वाचन केले जाते.
महाराजांनी लिहिलेली ही ग्रंथ संपदा सम्पूर्ण संवत्सर ही ६० वर्षाची आहे हिंदू धर्म परंपरेनुसार अन पंचांगानुसार ही ६० वर्षांची भविष्य शृंखला पूर्ण झाली की पुन्हा नव्याने प्रारंभीपासून त्याच संवत्सरांची सुरुवात पहिल्या पासून होते आणि तेच ६० संवत्सर काय आहेत..? जागतिक वार्षिक उलाढाल कशी..? असेल हवामान अंदाज....!
याविषयी महाराजांनी संजीवन समाधिस्त होण्यापूर्वीच लिहून ठेवलेलं आहे आणि दरवर्षी जे लिहिलेलं आहे तेच घडत आहे...

              महाराजांच्या हस्ताक्षरातील संवत्सर

 हे समस्त कर्जतकर भाविक भक्तांना याचा अनुभव असल्याने दरवर्षी गुढीपाडव्याला हे ऐकण्यासाठी भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने आतुर असतात..महाराजांनि जे काही लिहून ठेवलेलं आहे ते तंतोतंत खरं लिहिलेलं आहे हे आपण अजून माहितीचा शोध घेतली तर लक्षात येते प्रत्येक ठिकाणी या वर्षी ची पंचांगानुसार भविष्यवाणी दिलेली ही सारखीच दिसून येते आहे. त्यामुळं यातून महाराजांची दूरदृष्टी अन तप साधना दिसून येते आहे..
            जगाला तारणारा " जगतारक " हा ग्रंथ सुद्धा महाराजांनी लिहून ठेवला आहे विविध आजारांवर रामबाण इलाज करणारे औषधी,अध्यात्मिक ग्रंथ संपदा महाराजांनी लिहून ठेवलेल्या आहे यावरून महाराजांच तत्वज्ञान किती व्यापक असेल हे दिसतंय..

            गुढीपाडवा ला केलेली श्रीं ची पूजा


महाराज हे किती मोठे योगी सिद्धपुरुष होते याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाहीत..आपलं भाग्य आहे अशा थोर संतांचे वास्तव्य आपल्या गावात झालेलं आहे ..अन त्यांनी इथेच संजीवन समाधी घेतलेली आहे...जस जस नवं नवीन माहिती वाचनातून समोर येईल ती ती माहिती आपल्यासमोर सातत्याने मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील..

        " ॐ अहंम् ब्रम्हांस्मि सोहंम् ब्रम्हांस्मि सोहं..."

   मीच ब्रम्ह आहे अन मीच निर्माता आहे हे या मंत्रातच सांगून ठेवलेलं आहे...🚩
   
                        ● श्री गणेशाय नमः ●
    || श्री संत सदगुरू गोदड महाराज कृत संवत्सर फल ||
                    शक शालिवाहन शके १९४५
                            सन २०२३ - २४  
         
शोभकृत ( शोभन नाम ) संवछरी ।। गुरू स्वामी ।। वायो कोणी देश भगैल । चैत्र वैशाखी सम होईल ।। जेष्ठादी मास ।।६।। फरकल ।। कार्तिक मास ।। सम 

            यंदाचे संवत्सर शोभन नाम आहे हे संवत्सर ६० संवत्सरांपैकी एक ३७ वे आहे यामुळे जगात शुभ फळांची अन या पृथ्वी तलावर होणाऱ्या संपदांची वृद्धी होईल हे यात सांगितले आहे या संवत्सराचा स्वामी बुध गुरू आहे...या वर्षी वायू नावाचा मेघ असल्या कारणाने अतिवृष्टी होईल वादळ वारा सोसाट्याचा असणार धन धान्याची नासाडी होईल घरांचे नुकसान होईल. चैत्र वैशाख हे महिने सम प्रमाणात जातील म्हणजेच या दोन्ही ही महिन्यातील आर्थिक स्थिती वातावरणातील तापमान व्यापारातील तेजी मंदि सारखीच प्रमाणात राहील जेष्ठ ,आषाढ, श्रावण, भाद्रपद ,अश्विन या ६ महिन्यातील परिस्थिती मध्ये चढ उतार कायम राहतील म्हणजेच अस्थिरता कायम राहील.कार्तिक ,मार्गशीर्ष ,पौष,माघ,फाल्गुन या ५ महिन्यातील सर्व परिस्थिती चैत्र वैशाख महिन्याप्रमाणेच सम प्रमाणात राहील या संवत्सरात पावसाची परिस्थिती पाहता वादळी पावसाची शक्यता आहे.या संवत्सरात लोकांमधील मैत्री वाढेल. पाऊस चांगला पडून धन धान्यांची समृद्धी होईल.रोगराई वाढेल पण लोक सुखी होतील.राजा बुध असल्या कारणाने पाऊस चांगला पडून धन धान्यांची वृद्धी होईल.वायव्ये कडील देशांची स्थिती चांगली राहणार नाही म्हणजेच
             आहे जगातील बहुतांश सीमाभाग जिथे तणाव आहेत ते कायम राहतील तसेच काही भागातील विषय मार्गी लागतील..

          संवत्सर वाचन करताना महाराजांचे सेवक
 पुजारी ह.भ.प. श्री पंढरीनाथ प्रभाकर काकडे महाराज

बहुत काय लिहिणे..
सेवेच्या ठाई तत्पर
सदगुरू चरणी निरंतर..

✍️ गणेश पंढरीनाथ काकडे
             
महाराष्ट्र भूषण

Comments

Popular posts from this blog

मोबाईलवरून पैसे कसे कमवायचे? | Online Earning Marathi Guide

घरबसल्या पैसे कमवण्याचे 10 खात्रीशीर मार्ग (2026 अपडेट)

सरकारी योजना 2026: सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या 10 महत्वाच्या योजना । मराठी माहिती