कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सदगुरू गोदड महाराजांच्या पुण्यतिथी च्या दुसऱ्या दिवशी पालखी उत्सव का साजरा केला जातो..?
ज्ञानेश्वर माऊलींनी मात्र आपण पंचमहाभूतांसहित लयातीत म्हणजे अमर झालो आहोत असे सांगितले आहे...
ज्ञानदेवें घेतले दान |
ह्रदयी धरूनियां ध्यान |
समाधि बैसला निर्वाण |
कथा किर्तन करीतू ||
या अभंगांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींची समाधी ही भक्ताची समाधी आहे. समाधी मध्ये ज्ञानेश्वर माऊली कथा, कीर्तन, भजन करत आहेत....
निवृत्ति सखा माझा दीनदयाळ श्रीगुरु ।
अळंकापुरीं स्थापियेलें दिधला विठ्ठल उच्चारु ।
समाधि जीवन माझें वरी अजानवृक्षतरु ॥
जोंवरी चंद्रसूर्य तोंवरी कीर्तिघट स्थिरु ॥
अन म्हणून च माऊलींची समाधी ही संजीवन समाधी आहे...आणि हे त्यांनी विठ्ठल भक्तीनेच साध्य केले....
तसेच भागवत धर्माची अखंड भगव्या ध्वजाची पताका आपल्या खांद्यावर घेऊन वयाच्या ७ व्या वर्षी आई वडील सर्व राजपाठ सोडून विठ्ठल नामात तल्लीन होत अमरसिंह भोसले हे वनात निघून गेले ते शेवटपर्यंत माघारी आले नाहीत....आपल कार्य काय आहे...? आपले गुरू कोण...? आपण कोण....? हे गुरू भेटीनंतर समजले " गोदड " हे नामकरण झाले दीक्षे नंतर " ॐ अहंम् ब्रम्हस्मि सोहम ब्रम्हस्मि इ हु "
" मीच ब्रम्ह आहे अन मीच निर्माता आहे..."
हा गुरुमंत्र कानी पडला...
त्यानंतर साक्षात पांडुरंग रायाने पंढरपुरी येण्याचे आमंत्रण दिले... तिथली न चुकता वारी चालू केली..पण तिथे मिळालेल्या अपमानास्पद वागणूकीमुळे " मी पुन्हा पंढरपुरी येणार नाही...पण इथून पुढे तुला मला भेटण्यास यावं लागलं हे पांडुरंग रायाकडून वचन घेतल्या नंतर पुढे भगवंता नेच सांगितलेल्या आदेशावर ...तूझ कार्य अजून पूर्ण झालेलं नाहीय तू तुझ्या मातुली ( मामाच्या गावी ) कर्णग्रामी ( कर्जत )जाऊन समाधिस्त व्हा आम्ही तिथं तुम्हाला भेटण्यास येऊ या वचनावर महाराज कर्णग्रामी म्हणजेच कर्जतला आले मामाच्या इथे राहू लागले पण इथेही त्यांचं मन रमेना ...महाराज विठलं भक्तमध्ये नामस्मरण करत गावात फिरायचे असेच एक दिवस फेरफटका मारण्यासाठी महाराज बाहेर गेले असता मामांच्या शेतात इरजिक होती त्यासाठी रात्रीचे भोजन संध्या काळी इरजिक असल्या कारणाने अंधार पडत होता म्हणून मामांनी या भोजनासाठी महाराजांच्या देवाच्या पूजेतील दोन समया प्रकाशासाठी वापरल्या महाराज फिरून आल्यावर त्यांना ही बाब समजली व महाराज क्रोधीत झाले व मामांच्या घरी इथून पुढे राहायचे नाही हा मनात निश्चय करून बाहेर पडले फिरत असताना ते उमाबाई काकडे शिंपी यांच्या दुकानी महाराज आले असता महाराजांच्या विठ्ठल भक्ती चे वेड पाहून आधीच श्रद्धावान माळकरी असलेल्या उमाबाईना महाराज च आपले गुरू आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांची मनोभावे सेवा त्या करू लागल्या...महाराजांनी उमाबाई ला विचारले की मी इथे राहू शकतो का ..? त्यावर अतिशय आनंदाने गुरुसेवा करण्याचे भाग्य माझ्या नशिबी आहे हे मनी मानून उमाबाईने आनंदने होकार दिला तिथून पुढे महाराज ही उमाबाई काकडे यांच्या घरी राहू लागले अन भजन कीर्तन करू लागले हळू हळू गावातील मंडळी महाराजांच्या दर्शनासाठी दररोज येऊ लागले...आपले अखंड धर्मकार्य महाराजांनी उमबाईं काकडेंच्या घरी राहूनच चालू ठेवले..बरेच अध्यात्मिक ग्रंथ जगतारक,अध्यात्म ज्ञानदीपक ,संतविजय,गोदड रामायण,वार्षिक संवत्सरी,यासारखी ग्रंथ संपदा लिहून ठेवली... काही काळानंतर जेव्हा आपले धर्मकार्य संपन्न झाले आहे आता आपण समाधिस्त व्हावं अस वाटू लागलं त्यावेळी हा आपला निर्णय आपले मामा निळोजी पाटील यांना सांगितला आणि महाराजांनी घेतलेल्या जागेवर समाधीस्थळ बांधण्यास सुरुवात करा हे सांगितले...
" या कर्णग्रामी माझे शिष्य बहुत आहेत ..पण माझ्या समाधी नंतर तूच माझी सेवा निरंतर अन निस्वार्थी करायची आहे...तू माझी निस्वार्थी सेवा कर..काळजी करू नकोस मी तुझा संसार सांभाळेल..अन कोणी जर तुला त्रास दिला च तर मी त्याच्याकडे पाहून घेईल " हे वचन महराजांनी शिष्य उमाबाई काकडे यांचे पती भिमाजीबुवा काकडे यांना सांगितले...आणि तसे बक्षीसपत्र देखील स्वतःच्या नावाने म्हणजेच आताच्या काळात त्याला सही म्हणतात तसे लिहून दिले आजही हे महाराजांच्या स्वहस्ते लिहिलेले अस्सल प्राकृत मराठी भाषेत असलेलं बक्षीसपत्र भिमाजीबुवा काकडे यांचे वंशजांनि व्यवस्थित पणे सांभाळून ठेवलेले आहे..
माघ कृष्ण चतुर्थी हा दिवस महाराजांनी समाधी साठी निवडला अन त्या दिवशी समाधीस्त महाराज झाले अवघे कर्णग्राम वासीय दुःख सागरात लोटले होते..समाधी वेळी सर्व उपस्थित होते ...*सर्वांच्या देखत एक तुलसीमाळ महाराजांच्या गळ्यात येउन अचानक पडली...
विठू आमचा अंतकाळ आला । फुलांचा वर्षाव केला | ज्ञानसमाधी साधिली । मूळ स्तंभी लावियली।।
रंगे शिला हो काढिल्या । तया गडावरी घातिल्या।
त्या ओढोनी आणिल्या । समाधिसी लावियल्या।।
एक थर हो रचिला । शिष्या बुक्का हो लाविला।
भाव शिष्यिणीचे ( उमाबाई ) पोटी । नवनीत पाजियले कंठी।।
तेथे आमुचे मायबाप । त्यांची अलाई भलाई।
गोदड म्हणे बोलू काई । आम्हा अयोध्येशी जाणे नाही
झाला घडला प्रकार गावकऱ्यांनी याची देही याची डोळा पहिला पंढरपूरच्या विठ्ठलाच्या गळ्यात असणारी तुळशीची माळ महाराजांच्या गळ्यात पडली होती....
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय...
श्री संत सद्गुरू गोदड महाराज की जय हा नामघोष गगनी निनादला...
परमशिष्य असणाऱ्या महासाध्वी उमाबाई काकड़े या मात्र यावेळी अति उद्विग्न अन दुःख सागरात लोटल्या होत्या महाराज समाधिस्त झाले होते तेवढयात त्यांनि आपल्या गुरूंना शेवटचे माझ्या हातचे दुध प्राशन करा म्हणून आर्त विनवणी केली...अन ती महाराजांनी दिव्य ज्ञानाने ओळखुन समाधी अवस्थेत असतानाही आपले डोळे उघडून आपल्या डोळ्यांनी ते दूध प्राशन केले...हा सर्व प्रकार गावकऱ्यांनी पहिला अन पुन्हा एकदा..
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय...
श्री संत सद्गुरू गोदड महाराज की जय... हा नामघोष गगनी निनादला...
महाराज समाधिस्त झाले नंतर गावकऱ्यांच्या लक्षात आले जस भगवान पांडुरंग राय हे रथ उत्सवास हजर असतात तसेच ते समाधी सोहळ्यास उपस्थित आहेत अन त्याचच प्रतीक म्हणजे महाराजांच्या गळ्यात पडलेली ही माळ.....
म्हणून महाराजांच्या रोजच्या पूजेत देव्हाऱ्यात असणाऱ्या श्री विठ्ठलाची प्रतिकात्मक पंचधातु ची मूर्ती पालखी मध्ये विराजमान करून पुण्यतिथी च्या दिवशी त्याची नगरप्रदक्षिणा करण्यात आली व आजही हीच नगरप्रदक्षिणा पांडुरंग रायांना पालखीत बसवून केली जाते...
आणि म्हणून च हा पालखी सोहळा भंडारा उत्सव म्हणजे महाराजांच्या समाधी दिनाच्या दुसऱ्या दिवशी विठ्ठल नामाच्या गजरात रात्रीच्या समयी सम्पूर्ण रात्र नगरप्रदक्षिणा दिंडी पताका घेऊन श्री विठ्ठल नामगजरा करत साजरा केला जातो...
सेवेच्या ठाई तत्पर सद्गुरू चरणी निरंतर
© गणेश पंढरीनाथ काकडे
Comments
Post a Comment