आज माघ शुद्ध पंचमी वसंत पंचमी अर्थात जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा जन्मदिवस विशेष लेख
आज माघ शुद्ध पंचमी/वसंत पंचमी अर्थात जगतगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा जन्मदिवस
"अणुरेणिया थोकडा तुका आकाशाएवढा''
महाराष्ट्राच्या सोनेरी इतिहासाची पानं उलगडताना महाराष्ट्राला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणजे सतरावं शतक,ह्या शतकात या महाराष्ट्राने सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती घडवणारे दोन रत्न जन्माला घातले,
एक जगदगुरु संत श्री तुकोराबाय आणि दुसरे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज
अज्ञान,दारिद्र्य आणि गुलामगीरीची वाट पाहणार्या समाजासाठी संत तुकोबारायांचा जन्म संजीवनी देणारा ठरला....
माणसाच्या जीवनात घडणार्या चांगल्या वा वाईट घटनांनी तो हुरळून वा खचून न जाता त्याकडे तटस्थपणे बघायचं असेल तर तुकोबारायांशिवाय पर्याय नाही.... नाहीतर स्वतःच्या पत्नी, मुलाच्या मृत्युकडे तटस्थ बघण्याचं धाडस कोण करील.
परमार्थिक क्षेत्रात श्री तुकोबारायांनी केलेल्या क्रांतीचं फळ आज आपण सर्वजन चाखतोय. तुकोबारायांच्या किर्तनाने लोकांना जगण्याची दिशा तर मिळालीच पण किर्तनाच्या परिणामाने अनेक लोकं स्वराज्यकार्यात सामील झाली ही,परमार्थ लोकांना निष्क्रिय करतो अस म्हणणार्यांना चपराक होती.
समाज एकट्यानं चालत नसतो, 'मला काय त्याचे 'असा विचार करून जगणार्या लोकांनी समाजाच्या भल्याकरीता आनंदाने दारिद्र्य पत्करणार्या तुकोबारायांना दिपस्तंभासारख डोळ्यापुढं ठेवलं पाहिजे.
तौलानिकदृष्ट्या विचार केला तर आज आपल्याकडं जे आहे, पैसा, संपत्ती, पद वगैरे हे तुकोबारायांकडं नसतानाही आपण त्यांच्या कृपेची अपेक्षा करतो यातच त्यांच मोठेपण आहे. कारण त्यांच्या ठिकाणी असणारा त्याग, वैराग्य,समर्पन, मातृभूमी विषयी असणारी निष्ठा या गुणांची आपल्याला अपेक्षा आहे.
तुकोबारायांनी फार सहज, सोप आयुष्य व्यतीत केल. पण त्यांना जाणून घेणं एवढं सोप नाही.
तुकोबाराय काही अंशात जाणून घेण्याकरिता आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा काळ जो की तारूण्याचा असतो तो काही अंशात उद्ध्वस्त करावाच लागतो हे निश्चित.
शेवटी समाधानी आयुष्य जगण्याकरिता केवळ जीवनात यशस्वी होऊन चालत नाही, तर आयुष्य सार्थकी लावावच लागतं.
यासाठी आकाशाएवढं उंच जरूर व्हावं पण यासोबत स्वतःला अणूपेक्षाही लहान करून ठेवण्याचं धैर्य आमच्यात असलं पाहिजे, हिच श्री संत तुकोबारायांची शिकवण आहे.....
उजळवया आलो वाटा
खरा खोटा न्यायनिवाडा
जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांना त्रिवार वंदन
- महाराष्ट्र भूषण
Comments
Post a Comment