श्री हनुमंत रायांशिवाय प्रभू श्रीराम अपूर्णच आहेत
श्री हनुमंत रायांशिवाय प्रभू श्रीराम अपूर्णच आहेत...!
होय....हे शाश्वत सत्य आहे पवनपुत्र श्री हनुमंत रायांशिवाय प्रभू श्रीराम अपूर्ण च आहेत....
प्रभू श्रीरामांच्या समस्त भक्तांगणांमध्ये सर्वात आधी नाव येते ते श्री वायूदेव - अंजनिपुत्र हनुमंतरायांचे च लहानपणापासून च अलौकिक दिव्य शक्ती प्रदान असलेले हनुमंत राय रामभक्त च होते त्यांना प्रभू च्या नामशिवाय अन्य काही दिसत च नव्हते अन जेव्हा या भगवंत अन भक्तांची भेट झाली तेव्हापासून च तर प्रभूंचे कवच कुंडल च हनुमंत राय झाले होते माता सीते च्या शोधत प्रभू श्रीराम असताना च दोघांची भेट झाली...आपल्या प्रभूंच्या आशीर्वाद हा शीर सावंद्य च होता...मग ते लंकेमध्ये जाऊ सितामाते जवळ प्रभूंचा निरोप पोहोचविणे असो ,प्रत्येक युद्ध असो ,लक्ष्मणाला मूर्च्छा आल्यावर संजीवनी पर्वत आणणे असो तसेच रावणाच्या लंकेत जाण्यासाठी दगडी पूल बांधणे असो यात महत्वाची भूमिका कोणाची तर त्या प्रत्येक प्रसंगा वेळी नाव येते ते हनुमंत रायांचेच...
सहज मी व्हाट्सप ला एक व्हिडिओ पहात होतो त्यात श्रीराम सेतू विषयी गुगल मॅप द्वारे तयार केलेला तो व्हिडीओ होता त्यात स्पष्ट पणे श्रीरामेश्वरम ते रावनाच्या श्रीलंका येथे जाण्याच्या रामयनकालिन नल - नील अन समस्त वानर सेनेने बनविलेला दगडी मार्ग सॅटेलाईट च्या साह्याने कुठं दगड तर कुठं पाणी अशा स्वरूपात दिसतो आहे पण एक गोष्ट त्यात दाखविली आहे त्यात श्रीराम सेतू च्या मार्गावर मध्यभागी ठळक अन स्पष्ट पणे शांत निद्रिस्त हनुमंत् रायांची मुद्रा दिसत आहे ती बघितल्यावर मी जरा अचंबित च झालो हनुमंत रायांचे एक अलौकिक दर्शन च झाले सत्य पडताळणी करण्यासाठी गुगल मॅप वर गेलो अन श्रीरामसेतु टाइप केलं अन सॅटेलाईट विवं मधून पाहिलं तर विश्वास बसत नव्हता .
पण हे खरच सत्य आहे.
अन ते कोणी काहीही म्हणलं अन अकलेचे तारे तोडले तरीही मिटवू शकत नाहीत.
वाल्मिकी रामायणानुसार हा पूल जवळ जवळ ७ हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे.
अन तो मानवनिर्मित पूल आहे जो नल - नील या रामयणकालिन अभियंत्यां द्वारे बांधण्यात आला अन त्यासाठी दगड आणणे ते व्यवस्तीत रचणे यात महत्वाची भूमिका ही श्री हनुमंत राय अन त्यांची वानरसेनेचीच होती.
हा पूल बांधताना जेव्हा दगड आणली गेली तेव्हा ती समुद्रात टाकली की समुद्रात जात होती ...पण जेव्हा त्या दगडांवर श्रीराम नाम लिहिले गेले तेव्हा ते दगड अक्षरशः त्या खोल समुद्राच्या पाण्यावर तरंगत होते...
अन आजही त्याचा पुरावा म्हणजेच हा श्रीराम सेतू ....आजही तो असच तरंगत आहे.
अन त्याच रक्षण आजही हनुमंत राय करत आहेत...!
म्हणूनच म्हणतो श्री हनुमंत रायांशिवाय प्रभू श्रीराम हे अपूर्ण च आहेत.....!
जय श्रीराम जय जय हनुमान...🙏🕉️🚩
- गणेश पंढरीनाथ काकडे
Comments
Post a Comment