मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे कै.आमदार रमेश लटके यांच्या पत्नी च्या उमेदवारी संदर्भात उपमुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र



मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे कै.आमदार रमेश लटके यांच्या पत्नी च्या उमेदवारी संदर्भात उपमुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र



  चित्र - फेसबुक साभार



नुकतंच आमदार कै. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी पूर्व या जागेसाठी पोट निवडणूक लागली आहे तिथे त्यांची पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे..त्यासाठी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे ...


प्रिय मित्र देवेंद्र ,सस्नेह जय महाराष्ट्र !

एक विनंती करण्यासाठी हे पत्र आपणास लिहिले आहे  

आमदार कै. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी पूर्व या जागेसाठी पोट निवडणूक लागली आहे तिथे त्यांची पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे..

कै.रमेश लटके एक चांगले कार्यकर्ते होते अगदी शाखा प्रमुखांपासून त्यांची वाटचाल सुरू झाली.त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे.त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्यानं कै रमेश लटके यांच्या आत्म्याला शांती मिळेल.

माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षाने ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.

मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवितात तेव्हा निवडणूक न लढण्याच धोरण स्वीकारतो तसं करण्यांन आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधी ला श्रद्धांजली च अर्पण करतो अशी माझी भावना आहे .आपणही तसंच करावं असं मला माझं मन सांगत.

असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला सुसंगतही आहे.मला आशा आहे आपण माझ्या विनंती चा स्वीकार कराल.

आपला मित्र,
राज ठाकरे.

 चित्र - फेसबुक साभार

राजकारणी असूनही एक चांगला माणूस कसा असावा ते राज ठाकरे यांच्याकडून शिकावं..राज ठाकरे यांच हे पत्र सोशल मीडियावर चांगलं च व्हायरल झाल आहे... राज ठाकरे यांच्या संवेदन शील पणाला आमचा मुजरा...🙏




Comments

Popular posts from this blog

मोबाईलवरून पैसे कसे कमवायचे? | Online Earning Marathi Guide

घरबसल्या पैसे कमवण्याचे 10 खात्रीशीर मार्ग (2026 अपडेट)

सरकारी योजना 2026: सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या 10 महत्वाच्या योजना । मराठी माहिती