भगवंत गजेंद्र हत्ती अन मानवी जीवन



भगवंत , गजेंद्र हत्ती अन मानवी जीवन
 
 

बऱ्याचदा तुमी हे चित्र पाहिले असेलच कदाचित ..यामध्ये एका मगरिने हत्तीचा पाय हत्तीचा धरला आहे ती त्याला ओढत आहे आणि तो हत्ती भगवान विष्णूला कमळ फुल अर्पण करत आहे ...त्याबद्दल आजच्या लेखात पाहुयात
 
 

चित्र साभार फेेेसबुुक


हे चित्र आहे हत्तींचा राजा " गजेंद्र " याचं
" गजेंद्र " हत्तीवर मोहित असणाऱ्या हत्तीनीच्या कळपासोबत तो कमळांच्या तळ्यात जलविहार करत असतो..अचानक एक मगर त्याचा पाय आपल्या तोंडात धरून त्याला नदीमध्ये खोल पाण्यात ओढत न्यायचा प्रयत्न करते..गजेंद्र आपला पाय सोडविण्यासाठी आटोकाट जिवाच्या आकांताने प्रयत्न करतो पण मगर काय तिची मगर मिठी सैल करत नाही ..बाकी हत्तींनीही त्याला सोडविण्यासाठी प्रयत्न करतात पण त्याना ते जमत नाहीच....मग असहाय होऊन शेवटी तो नदीतील एक कमळ आपल्या सोंडेमध्ये उचलतो आणि भगवान श्री विष्णूची विनवणी करतो..
       ही गोष्ट आणि चित्र का आहे यामागचे कारण म्हणजे " मानवी परिस्थिती " चे यात चित्रण केलेलं आहे.. आपण सगळेच 
" गजेंद्र " आहोत कधी कधी देवांसारखेच ऐहिक आणि भौतिक सुखासाठी आपण आसुसलेले असतो..आणि जरी ती आपल्याला मिळाली तरीही आपल्याला सुरक्षित वाटत नसते..असुरक्षतेमुळे सुखाची अपेक्षा करणारा मग तो कर्मवाद होतो..किंवा त्याचे रूपांतर हे थंडपणा किंवा कडवट पणा यामध्ये होते...कारण त्यावेळी आपल्या जीवनात काही अर्थच उरलेला नसतो..इतर वेळी असुरांप्रमाणे आपण भौतिक वृद्धी साठी तळमळत असतो..ते आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय राहते..जेव्हा आपली ऐहिक दृष्ट्या प्रगती होते परिस्थिती आपल्या विरोधात जात नाही तेव्हा मात्र आपण उद्धट होतो निर्ढावतो संकटाच्या काळी मात्र गजेंद्रासारखी हातपाय आपटून तडफड करतो आणि त्या दुर्दैवाच्या मगर मिठीमधून सुटण्यासाठी प्रयत्न करतो..आपल्या मदतीला तेव्हा कुणीही नसते..मग आपण अस्वस्थ होतो अधीर होतो..या अवस्थेमधून सुटका होण्यासाठी जेव्हा आपण भगवंताच्या ज्ञानसंपदेला ज्या त्याच्या कथा ...चिन्हे तसेच कर्मकांडातून मिळवतो त्या ज्ञानभांडाराला शरण जाऊ.. तेव्हाच आपली या अवघड अवस्थेमधून सुटका होईल...☺

🖋 गणेश पंढरीनाथ काकडे...





Comments

  1. खुप छान बोध आहे या कथेचा....

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद शेअर जरूर करा

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मोबाईलवरून पैसे कसे कमवायचे? | Online Earning Marathi Guide

घरबसल्या पैसे कमवण्याचे 10 खात्रीशीर मार्ग (2026 अपडेट)

सरकारी योजना 2026: सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या 10 महत्वाच्या योजना । मराठी माहिती