होय सह्याद्रीचा तो शिवसूर्य त्या रायगडावर आहे
होय सह्याद्रीचा तो शिवसूर्य त्या रायगडावर आहे
होय .....साक्षात
श्री_शिवछत्रपती दुर्गराज
श्री_रायगडावर आहेत.....!
हिंदवी स्वराज्याच्या हिंदुसम्राट छत्रपती श्री शिवरायांच्या ३२ मण सुवर्ण सिंहासन पुनः संस्थापना संकल्प दिन दि.४ जून २०१७ या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा श्री रायगडावर गेलो होतो संकल्प झाला शिवसमधी च दर्शन घेण्यासाठी समाधी स्थळाकडे निघालो पण गर्दी लय होती मग रायगड संपूर्ण पाहिला त्यानंतर गर्दी कमी झालेली दिसल्यावर जगदीश्वराच्या मंदिराच्या दिशेने आम्ही सर्व धारकरी गेलो
सगळ्यात आधी शिवसमाधी ला कधी डोकं टेकवल अस्स झालं होतं शेवटी रांगेत उभं राहिलो प्रवेशद्वार जवळ येत च होत तसं तसं महाराज जवळ असल्याचा भास होत होता एकदाचा समाधी जवळ आलो समाधी कडे पाहिलं त्या शिळे कडे बघितल्यावर त्यावर कोरलेली महाराजांची प्रतिमा पहिली ती डोळ्यात सामावून घेतली अन डोकं टेकविले साष्टांग नमस्कार करून समाधी चे दर्शन घेतले नतमस्तक झालो अन उठलो एक एक धारकरी दर्शन घेत होते आम्ही समधीसमोर हात जोडून उभेच होतो तेच नकळत माझ्या तोंडून ध्येयमंत्राला सुरुवात झाली
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।।
सगळं वातावरण शांत झाल होत ...तिथे उपस्थित असलेले सर्व धारकरी एका जागेवर उभे राहून हात जोडून आमच्या आवाजात आवाज मिसळत ध्येयमंत्र म्हणू लागले ..सर्व पोलिस कर्मचारी सुद्धा त्यात सहभागी होऊन ध्येयमंत्र म्हणू लागले अन धेयमंत्र घेताना अक्षरशः साक्षात श्री शिवछत्रपती ना समोर असल्याची जाणीव होत होती अंगावर शहारे आले होते अन डोळ्यातून पाणी घळा घळा येत होतं....
साक्षात श्री शिवछत्रपती आभाळभर आशीर्वाद देत असल्याचा च अनुभव आला....
- गणेश काकडे 🙏⛳
This comment has been removed by the author.
ReplyDelete