ना नफा न तोटा या तत्वावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नगर शहरच्या वतीने रुग्णांच्या सेवेत रुग्णवाहिका दाखल
ना नफा न तोटा या तत्वावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नगर शहर च्या वतीने रुग्णांच्या सेवेत रुग्णवाहिका दाखल करू
कार्य ज्याने ऊभा देश जागे ।
असंख्यास वाटे चला जाऊ मागे ॥
समस्ता उरी पेरुया राष्ट्रमंत्र ।
शिवाजी जपू मंत्र बनण्या स्वतंत्र ॥
शिवतपस्वी श्री संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी यांना संबंध देश ओळखतात त्यांच देशप्रेम अन शिवाजी संभाजी रक्तगटाचे त्या मार्गावर चालणारे शिवपाईक राष्ट्रासाठी कधीही कायम देव देश धर्मासाठी तत्पर असणारे तरुण या देशात तयार व्हावे यासाठी आपले संबंध आयुष्य समर्पित केलेले वर्तमानकाळात " दधिची ऋषी " असणारे श्री संभाजीराव भिडे गुरुजी अन त्यांचे धारकरी समाजासाठी कधीही तत्पर असतात..
याचे च उदाहरण म्हणजेच नगर शहरात कार्यरत असणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे धारकरी ...
कोरोना काळात रुग्णांचे रुग्णवाहिकेमुळे असंख्य हाल होत होते ..ही बाब लक्षात घेता नगरच्या धारकऱ्यांकडून नगरमध्ये
रुग्णासाठी ना नफा ना तोटा तत्वाने रुग्णवाहिनी सुरू केली आहे.
या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.
यावेळी नगर शहरातील सर्व धारकरी उपस्थित होते...नगर शहर आणि बाहेर गावी रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास ही सेवा उपलब्ध असेल अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे नगर शहर प्रमुख देविदास मुदगल यांनी दिली..
" असे वज्र निर्धार ज्यांच्या उरात,अशांची शिवाजी असे जन्मजात.."
महराष्ट्र भूषण तर्फे समस्त धारकर्यांना मानाचा मुजरा
Comments
Post a Comment