तेलंग देसी युद्धे होतील श्री संत सदगुरू गोदड महाराज लिखित वार्षिक जागतिक भविष्यवानी बाढ २०२१-२०२२
तेलंग देसी युद्धे होतील.." श्री संत सदगुरू गोदड महाराज लिखित वार्षिक जागतिक भविष्यवानी बाढ : २०२१-२०२२
श्री_संत_सदगुरू_गोदड_महाराज_जागतिक भविष्यवानी
२०२१- २०२२
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!
। । ब्रह्मध्वजाय नम:।।
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हिंदूनुतनवर्षाभिनंदन !
चैत्र शुध्द प्रतिपदा , दि. १३ एप्रिल २०२१ गुढीपाडवा
।। श्री ।।
।। श्री गणेशाय नमः ।।
।। श्री गोदडनाथाय नमः।।
श्री सदगुरु गोदड महाराज कृत हस्तलिखित✍ संवत्सरी फल
************
स्वस्तिश्री मनृप शालिवाहन शके १९४३ प्लवनाम संवत्सर
विक्रम सवंत -२०७७-७८
इसवी सन - २०२१-२०२२
" प्लवनाम संवत्सरी "
"प्लवंग संवत्सरी ।। नळ (मंगळ) स्वामी ।। वर्षावो प्रबळ मेघ पडतील ।। चैत्र स्वस्त ।। वैशाखी धान्य पिकतील ।। तेलंग देसी आगी लागतील ।। रार्जयासी पीडा होईल ।। थोर आखाडी पछेमे वायू उत्पात होईल ।। श्रावणी भाद्रपदी मेघ वर्षेतील ।। अश्विन कार्तिकी विग्रहो होईल ।। लोकांसी उपद्रवो होईल ।। तेलंग देसी युद्धे होतील ।। कांतीयेन नगरिसी लोकांसी पीडा होईल ।। पूस मास ।।३।। स्वस्त जाणावे ।।
।। अर्थ ।।
स्वस्तिश्री मनृपशालिवाहन शक १९४३प्लवनाम संवत्सर
"इसवी सन २०२१-२२"
यावर्षीच्या (इ.स.२०२१-२२) या संवत्सराचे नाव " प्लवनाम संवत्सर "आहे.या संवत्सरामध्ये असे आहे ...या वर्षीचा स्वामी नळ (मंगळ) आहे.या संवत्सरात मुबलक प्रमाणात पाऊस होईल.चैत्र महिन्यात स्वस्ताई होईल.वैशाख महिन्यात धान्य पिकेल.तेलंग देसी आगी लागतील.राजकारणी लोकांना त्रास होईल. देशाच्या पश्चिम भागात मोठी वादळे येतील.श्रावण भाद्रपद महिन्यात पाऊस पडेल .अश्विन व कार्तिक महिन्यात देशात अरकजकता माजेल. त्याचा जनतेला त्रास होईल. तेलंग देसी युद्ध होतील.
पौष,माघ, फाल्गुन या तीन महिन्यात स्वस्ताई होईल.
वरीलप्रमाणे श्री संत सद्गुरू गोदडनाथ महाराज यांच्या "साठ संवत्सर "या ग्रंथातील साठ वर्षांच्या भविष्यवाणी पैकी ई. स.२०२१-२२ या सालातील
" प्लावनाम संवत्सरचे" वार्षिक भविष्यवाणी केलेली आहे ...याचे वाचन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंदिराचे पुजारी ह.भ.प.श्री पंढरीनाथ काकडे महाराज यांनी केले...
🔺दाते पंचांगानुसार या वर्षीचे पावसाचे मान कसे राहील ते आपण पाहूया ..
🔺या संवत्सरात पाऊस चांगला पडेल मात्र पिकांची नासाडी होईल.चोर आणि टोळधाड यांच्यापासून त्रास होईल.लोकांमध्ये कलह वाढेल तसेच रोगराई वाढेल.
🔴 खरिपाचा स्वामी शुक्र असल्याने पाऊस पुष्कळ पडेल.धनधान्याची वृद्धी होईल..रोगराई कमी होईल.
🔴 रब्बीचा स्वामी बुध असल्याने गहू,मूग,ऊस, भात,दुधदुभते मुबलक मिळेल..
मेघनिवस परिटाचे घरी असून रोहिणी नक्षत्र तटावर पडेल.त्यामुळे पाऊस पुष्कळ पडून धनधान्य समृद्धी होईल.
यावर्षीच्या तीन आढक म्हणजेच पर्जन्यमान एकंदरीत मध्यम असून एकूण पडणाऱ्या पावसांपैकी सहा भाग नद्या व पर्वत यावर आणि चार भाग भूमीवर याप्रमाणे पाऊस पडेल.
एप्रिलच्या मध्यानंतर वळवाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.सुरुवातीच्या काळात पर्जन्यमान कमी राहील.मधली काही नक्षत्रे पर्जन्यास अनुकूल आहेत.पण एकंदरीत पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहील.मान्सूनचे आगमन थोडे लांबेल...
★नक्षत्रावर पाऊस पुढीलप्रमाणे★
१) मृग नक्षत्र- दि.८ जून २०२१ रोजी मंगळवारी स.६.४० वा. सूर्याचा या नक्षत्रात प्रवेश.
वाहन गाढव 🐄
या नक्षत्राचा पाऊस मध्यम होईल.
दि.१२ जून ते १८ जून पाऊस अपेक्षित..
२) आर्द्रा नक्षत्र - दि.२१ जून २०२१ रोजी नक्षत्र प्रवेश .
वाहन कोल्हा 🦊
या नक्षत्राच्या पूर्वार्धात पाऊस चांगला पडेल.१ जुलै नंतर भूकंपाची शक्यता दिसते .दि.२६ जून ते ३० जून पाऊस अपेक्षित .
३) पुनर्वसू नक्षत्र - दि ५ जुलै २०२१ रोजी नक्षत्रप्रवेश.
वाहन उंदीर 🐀
या नक्षत्रात मध्यम वृष्टीचे योग्य आहेत.दि.१० ते १५ पाऊस अपेक्षित.
४) पुष्य नक्षत्र - दि.१९ जुलै २०२१ रोजी नक्षत्र प्रवेश
वाहन घोडा🐎
या नक्षत्राचा पाऊस उत्तरार्धात जो धरेल.२३ जुलै ते २९ जुलै पाऊस अपेक्षित आहे..
५) आश्लेषा नक्षत्र- दि.२ ऑगस्ट रोजी नक्षत्र प्रवेश
वाहन मोर🦚
या नक्षत्राचा पाऊस लहरी असेल .काही भागात चांगली वृष्टी होईल दि.४ऑगस्ट ते १२ ऑगस्ट पाऊस अपेक्षित ..
६) मघा नक्षत्र- दि.१६ ऑगस्ट २०२१ रोजी नक्षत्र प्रवेश
वाहन गाढव🐐
पाऊस समाधान कारक होईल पण काही भागात वारा सुटून ढग निघून जातील .दि.२० ते २६ ऑगस्ट पाऊस अपेक्षित.
७) पूर्वा नक्षत्र- दि.३० ऑगस्ट २०२१ रोजी नक्षत्र प्रवेश
वाहन बेडूक 🐸
या नक्षत्राचा पाऊस मध्यम ते कमी प्रमाणाचा होईल आणि सर्वत्र होणार नाही. दि.३ ते ८ सप्टेंबर पाऊस अपेक्षित
८) उत्तरा नक्षत्र- दि.१३ सप्टेंबर २०२१ रोजी नक्षत्र प्रवेश
वाहन म्हैस 🐃
या नक्षत्राचा पाऊस मध्यम प्रमाणात होईल काही भागात पिकांना उपयुक्त असा होईल.दि.१६ ते २२ सप्टेंबर पाऊस अपेक्षित..
९) हस्त नक्षत्र - दि.२७ सप्टेंबर २०२१ रोजी नक्षत्र प्रवेश
वाहन घोडा 🐎
या नक्षत्राचा पाऊस उत्तरार्धात शेवटी बऱ्यापैकी होईल.पण खंडित वृष्टीचा योग आहेत दि.१ ते ६ ऑगस्ट पाऊस पडेल..
१०) चित्रा नक्षत्र- दि.१० ऑक्टोबर २०२१ रोजी नक्षत्र प्रवेश
वाहन मोर 🦚
या नक्षत्रात काही भागात पाऊस ओढ धरेल दि.१३ ते १९ ऑक्टोबर पाऊस अपेक्षित..
११) स्वाती नक्षत्र - दि. २३ ऑक्टोबर २०२१ रोजी नक्षत्र प्रवेश
वाहन गाढव 🐐
या नक्षत्राचा पाऊस फारसा होणार नाही.पण काही भागात पिकास पोषक असा होईल दि.२८ ते ३१ ऑक्टोबर पाऊस अपेक्षित..
।। शुभं-भवतू ।।
हिंदू ⛳ नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गुरुमंत्र👇👇
"ओम अहंम ब्रम्हास्मी , सोहम ब्रम्हास्मी ईदम"
श्री संत सदगुरू गोदड महाराज संजीवन समाधी संस्थान श्री क्षेत्र कर्जत (धाकटी पंढरी) जि. नगर
🖋
Comments
Post a Comment