भिमाजीबुवा काकडे शिंपी अन श्री संत सदगुरु गोदड महाराज
भिमाजी बुवा काकडे शिंपी अन श्री संत सदगुरु गोदड महाराज
महाराष्ट्र ही संताची भूमी आहे प्रत्येक गावाला संतांचा महिमा सांगणारा इतिहास आहे असच अहमदनगर जिल्ह्यातील ता.कर्जत (धाकटीपंढरी) चे ग्रामदैवत असणारे निस्सीम विठठल भक्त श्री संत सद्गुरू गोदड महाराज हे महान संत शके १६८१ (१७५९)- शके १७५९(१८३७) या काळात होऊन गेले... भगवान श्री पांडूरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर ची दर एकदशी वारी करत असत पंढरपूर ला एके दिवशी चंद्रभागेमध्ये पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका स्त्री चा पाय राहुटीच्या दोरीला अडकला अन ती पडली तिचे मडके फुटले आणि सर्व पाणी वाया गेले मग चिडून त्या स्त्री कडून अपमान झाल्यावर महाराज क्रोधीत झाले अन चिडून विठ्ठल मंदिराकडे बघून.. मी पुन्हा तुझ्या कडे येणार नाही...हे जे ती स्त्री बोलली ते ती नाही तर तूच तिच्या रूपाने बोलला आहेस... तुला माझा कंटाळा आलाय.... आता मी स्वतः ला अग्नी समर्पित करून टाकतो ......म्हणून रागात चंद्रभागे तिरी आपले सर्व दिंडी साहित्य पेटवून त्यात उडी मारणार..... तोच भगवान पांडुरंग ब्राम्हणाच्या वेशात येऊन महाराजांना थांबवत म्हणाले हे काय करत आहात आपण... " साधू कुळास दुषण लागेल आपण हे पाप करू नये आपण आपले भूलोकी चे कार्य समाप्त झाल्यानंतर कर्णग्रामी (कर्जत) आपल्या जन्मगावी समाधी घ्यावी...." हे म्हणत पांडुरंगाने मूळ रुपात येऊन महाराजांना दर्शन दिले ... भगवान पांडुरंगाचे दर्शन झाल्यावर महाराज पांडुरंगाला म्हणले "मी पुन्हा तुझ्याकडे येणार नाही ....तर तू स्वतः मला भेटायला यायचे.."असे वचन घेतले अन पुन्हा पंढरपूर ला महाराज कधीही गेले नाहीत.
तिथून थेट कर्जतला आपल्या मामाच्या गावी राहायला लागले इथे मग काही दिवसांनी विठ्ठल भक्त असलेल्या उमाबाई काकडे यांची भेट झाली महाराज योगी साधू पुरुष आहेत हे जाणून त्या महाराजांची सेवा करू लागल्या मामाच्या घरी मन रमेना मग महाराज उमाबाई काकडे यांच्या घरी च राहू लागल्या उमाबाई पण मनोभावे महाराजांची सेवा करू लागल्या असेच बरेच दिवस गेले... महाराजांचे अनेक साक्षात्कार उमबाईना अन कर्जतकराना झाले.
उमाबाई भिमाजीबुवा काकडे ( शिंपी )
काही दिवसानंतर महाराजांनी आपले मामा निळोजी व निंबाजी तोरडमल यांना आपल्या जवळ बोलवून घेतले आणि म्हणले " माझे अवतारकार्य पूर्ण झाले असून ,मी आता समाधी घेणार आहे ...!
म्हणून तुम्ही आता समाधीस्थळ बांधण्यास सुरुवात करावी हे ऐकून निळोजी अन निंबाजीचे अंतःकरण दुःखी खूप झाले.. महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी समाधिकार्यास प्रारंभ केला ..
महाराज त्यांना म्हणाले ' मी आता २१ दिवसाचे "अनशन व्रत " धारण करणार असून २१ व्या दिवशी देह ठेवणार आहे म्हणजेच समाधिस्त होणार आहे .. ' असे सांगून महाराजांनी आपल्या व्रतास सुरुवात केली योगासन घालून महाराज २१ व्या दिवशी म्हणजेच माघ वद्य चतुर्थी ,वार मंगळवार या दिवसाचा दुसरा प्रहर ,शके १७५९ ( इ.स.१८३७ ) या दिवशी समाधी अवस्थेतच देह ठेवला ..
ही वार्ता गावात पसरल्यानंतर गावातील सर्व पेठकरी ,गावकरी, जमले सर्वांनी महाराजांना चौरंगावर बसवून स्नान घातले व त्यांचा देह उचलून समाधीस्थळी आणून दुसऱ्या चौरंगावर ठेवत पुढे नामघोष चालू होता..
ध्यान समाधी लावीली मूळ स्तंभि अनियिली ।
विठू अमुचा अंतकाळ आला फुलांचा वर्षाव झाला ।।
सर्वजण दुःखसागरात डुंबून गेले होते... महाराजांच्या परमशिष्य उमाबाई यांना अतोनात दुःख झाले त्या सर्वांच्या पुढे आल्या व त्यांनी हातामधील दुधाचा प्याला महाराजांसमोर ठेवला हाथ जोडले व महाराजांना विनवणी करू लागल्या " हे दूध आपण प्राशन करावे ..." अन चमत्कार झाला आपल्या व्याकुळ भक्ताची हाक ऐकून महाराजांनी आपले डोळे उघडले व दुधाच्या प्याल्यावर आपली दृष्टी टाकली त्या प्याल्यातील दूध महाराजांनी आपल्या दृष्टीने प्राशन केले ...हा सर्व प्रकार सर्व ग्रामस्थ व पेठकर्यांनी पाहिला त्या सर्वांना खूप आश्चर्य वाटले...
महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी भिमाजीबुवा ना बोलवून घेऊन त्याना स्वतः च्या गळ्यातील माळ घातली अन सांगितले की आजपासून "चिरंजीव भिमाजी, तू माझी निस्वार्थी पणाने सेवा कर या पंचक्रोशीत माझे शिष्य बहुत आहेत पण तू या सेवेचा संभाळ कर...."
"कसलीही काळजी करू नकोस, तू माझी निस्वार्थी सेवा कर मी तुझा संसार पाहतो.." असे महाराजांनीे स्वहस्ते बक्षीसपत्रामध्ये लिहून ठेवलेले आहे. तेव्हापासून भिमाजीबुवा काकडे हे महाराजांची सेवा अखंडपणे करू लागले.
धन्य ती उमाबाई जिने महाराजांची निरंतर सेवा केली त्या सेवेच फळ म्हणून स्वतः महाराजांनी उमाबाई चे पती भिमाजीबुवा काकडे ( शिंपी ) यांचे नावे बक्षीस पत्र तयार लिहून ठेवलेले आहे.
महाराजांनी स्वहस्ते लिहून ठेवलेले बक्षिस पत्र
त्या बक्षीसपत्रानुसार च आजही भिमाजी बुवा काकडे शिंपी यांचे वारसदार निरंतर अव्याहतपणे निस्वार्थी भावनेने महाराजांची सेवा करतात...
आता आम्हा एकचि काम ।
बीज वाढवावे नाम ।।
अशा थोर गोदड भक्ताने शके १८०४ ला माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमी दिवशी आपला देह ठेवला.
धन्य ते कुळ ,धन्य तो देश |
जेथे हरीचे दास जन्म घेती ||
सेवेच्या ठाई तत्पर
सदगुरू चरणी निरंतर ..
✍
पुजारी गणेश पंढरीनाथ काकडे



Comments
Post a Comment