परस्त्री मातेसमानच हीच शिवरायांची शिकवण
धारकरी
आम्ही मोहिमेवरून घरी जात होतो आमचा टेम्पो रसाळगडावरून चिपळूण मार्गे सातारा-फलटण-बारामती-कर्जत असा जाणार होता
आमच्यातील काही धारकर्यांना सातारचे प्रसिद्ध कंदी पेढे घ्यायचे होते म्हणून आमचा टेम्पो आम्ही सातारा मधील फलटण फाट्यावर थांबवला होता रात्रीचे 11.30 वाजले होते ज्यावेळी आम्ही त्या फाट्यावर गाडी थांबवत होतो तिथ फाट्यावर काही 5 6 महिला फलटण ला जाण्यासाठी गाडीची वाट बघत होत्या आमच्या पण गाडीला त्यांनी हात केला आम्हालाही थांबायचं होत थोडा वेळ म्हणून आम्ही रस्त्याच्या कडेला गाडी पार्क केली आम्ही उतरतच होतो त्यातील काही महिला आमच्याकडं आल्या आम्हाला म्हणल्या आम्हाला फलटण ला जायचं आहे 2 तास झालं आम्ही थांबलो आहोत पण कोनि आम्हला गाडी थांबवत नाहीय आम्हला फलटण पर्यंत नेता का आमच्या टेम्पोत आधीच 25 30 जण होतो आम्ही त्यामुळं त्याना कुठ बसवायचं हा प्रश्न होता आधीच सगळे धारकरी 4 दिवस थकलेलं होते मग थोडा वेळ थांबा म्हणलं पोरांना काही मिठाई घायची आहे ती घेतली की करतो म्हणलं काहीतरी नियोजन आता रात्री चे 12 वाजत आले होते तरीपण त्याना गाडी काय भेटना मग गाडीतील सगळ्या धारकर्यांना म्हणल थोडा वेळ फलटण पर्यंत सगळे जागा करा त्या महिलांसाठी तर आपले धारकरी एवढे थकून भागून पण त्यांनी जागा केली मग त्या पाचही महिलांना आपल्या टेम्पो मध्ये आम्ही व्यवस्थित जागा करून बसवलं आता जागा काय पुराना दाटी झाली मग काय आपले 5 6 धारकरी एवढं गार लागत होतं तरीपण टेम्पो च्या टपावर जाऊन बसले आणि अजून मोकळी जागा केली मग सगळ्यांना बसवलं त्यांच्याबर एक लहान मुलगा पण होता मग फलटण मध्ये त्याना सुखरूप रात्री 1 वाजता घरी पोहचवलं टेम्पो तुन उतरताना त्यांनी पैसे द्यायला लागले त्याना म्हणलं पैशासाठी नाय तुम्हला आणलं मावशी तुम्ही आमच्या आई सारख्या आहात अन तुमची फजिती झालेली आम्हला काय स्वस्थ बसू द्यायन आणि मदत करणं हे तर आमचं काम च आहे नाहीतर आम्ही जे हिंदुत्वाच काम करतो त्याला काय अर्थ आहे त्यांच्या पाया पडलो आम्ही त्या म्हणल्या तुम्ही आमच्या भावासारखे धावून आलात देव तुम्हला सुखात ठेवो असा आशीर्वाद पण दिला तुम्ही नसता तर अजून आम्हला रात्रभर तिथं च ताटकळत बसाव लागलं असत जाताना त्यांनी आवर्जून म्हणल्या फलटण ला आल्यावर आमच्या इथं जेवायला यावं लागलं आता फलटण ला आल्यावर नक्की या...
म्हणलं नक्की येतो...
अन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो...!
छत्रपती श्री शिवरायांची आमच्या आई वडिलांची आणि आमच्या गुरुवर्यांची आम्हला हीच शिकवण आहे परस्त्री मातेसमान च....!
महाराष्ट्र भुषण
गुरूजी...🙏🙏🙏🙏
ReplyDeleteघरात एक चालती बोलती लक्ष्मी पाणी भरती आहे.
ReplyDeleteअन्नपूर्णा होऊन भोजन बनवते आहे.
गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळते आहे.
सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेते आहे .
दुर्गा होऊन संकटांशी सामना करते आहे.
कालिका,चंडिका होऊन घरांचे रक्षण करते आहे.
तिची पूजा नको पण स्त्री म्हणून सन्मान व्हावा.
देवी फक्त देव्हारयात नाही मनातही बसवा.
मुर्ती बरोबर जीवंत स्त्रीचाही आदर करा.
जागतीक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!🚩🚩🚩🚩 जगदंब 🚩
जय श्री राम जय श्री शिवराय 🙏🚩
ReplyDeleteआपण आपला अभिप्राय मांडल्याबद्दल धन्यवाद लेख आवडल्यास शेअर जरूर कराच...
ReplyDelete